20 April 2024 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | मुख्यमंत्री-शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

SSC Exams, HSC exams

मुंबई, १२ एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आणि पालक संघटनांनी केली होती.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झालीआहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णसंख्या पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात, असं मत बैठकीत मांडण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

News English Summary: A new schedule for Class X and XII examinations is likely to be announced in today’s meeting. It was suggested at the meeting that the examination should be postponed due to the number of corona patients. It has been decided to postpone the 10th and 12th exams between Chief Minister Uddhav Thackeray and Varsha Gaikwad.

News English Title: Maharashtra SSC and HSC exams has been postpone said education ministry news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x