1 May 2025 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज या मूळ विचाराने का होत नाही - राज ठाकरे

Raj Thackeray

पुणे, २० ऑगस्ट | माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संबंध काय? हे मला एकदा शरद पवार साहेबांनी सांगावं, असं आव्हान देतानाच मी प्रबोधनकारांची सर्व पुस्तके वाचली आहेत. तसेच यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.

राज ठाकरे पाचव्यांदा पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. मी प्रबोधनकार ठाकरे पण वाचले अन् यशवंतराव चव्हाणपण वाचले आहेत. मी जे बोललो त्याच्या माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं, असं राज म्हणाले. मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज या मूळ विचाराने का होत नाही (MNS Chief Raj Thackeray reply to NCP president Sharad Pawar over caste politics statement) :

पवारांच्या भाषणाची सुरुवात…?
यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या एका भव्य मुलाखतीमधील एका प्रश्नाचा दाखलाही दिला. ‘शरद पवार यांची भव्य मुलाखत घेतली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राचं एक हुक, म्हणजे ज्यातून सर्वजण एकत्र येतात, असं काय वाटतं तुम्हाला? मला एक साधारण अंदाज होता की ते काय उत्तर देतील. त्या प्रमाणे त्यांनी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराज. मग मी त्यांना विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज हे जर आहे, तर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात किंवा तुमचा पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? मूळ विचार जर आपण पाहिला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे’, असं राज ठाकरे (Raj Thackeray and Sharad Pawar) यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढला. यापूर्वी जातीजातीत मतदान व्हायचं. पण राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी. यावर मला सांगितलं जातं प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. मी सर्वांची पुस्तकं वाचले आहेत… प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे. त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं.

आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकारांचं घ्यायचं आणि.. :
जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. १९९९ साल जर आपण पाहिलं, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही असं करता येणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार देखील मी वाचले आहेत”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS Chief Raj Thackeray reply to NCP president Sharad Pawar over caste politics statement news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या