11 May 2025 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सत्ता जाण्याच्या भीतीनेच मोदींच्या ९, शहांच्या २०, फडणवीसांच्या ५० सभा: शरद पवार

PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Sharad Pawar, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत प्रश्न उपस्थित केला की, विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांशी कोणताही सामना नाही हे भाजपला वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर सभा का आयोजित करत आहात?. चाळीसगाव येथे सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, सत्ताधारी भाजप भाजप झोपेत आहे आणि त्यामुळेच ते गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम ३७० रद्द केल्याबद्दल पवारांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले.

त्यानंतर जामनेर येथील सभेत पवार म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणाले आहेत की निवडणुकीच्या संघर्षात भाजपासमोर कुठेही विरोधी पक्ष दिसत नाही.” मी महाराष्ट्र कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे. जर त्यांना वाटत असेल की महाराष्ट्रात विरोधकच नाही मग पंतप्रधान राज्यात तब्बल ९ सभा का घेत आहेत, केंद्रीय गृहमंत्री २० आणि मुख्यमंत्री ५० सभा का घेत आहेत?. कारण भाजपाची झोप उडाली आहे आणि राज्यातील तरुण त्यांचा पराभव करण्यासाठी तयार आहेत. म्हणूनच ते महाराष्ट्रात फिरत आहेत. ”शहा यांनी महाराष्ट्रासाठी काय केले असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

पुढे पवार म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजना १९७८ मध्ये महाराष्ट्रात रोजगार हमी योजना राबविली गेली.तसेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. भाजपच्या राजवटीत कारखाने आणि व्यवसाय बंद पडत आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या काळात तब्बल १६,००० शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असं देखील पवार म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या