14 July 2020 5:40 PM
अँप डाउनलोड

लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, मग संसार नीट कसा होईल? - आ. रोहित पवार

Facebook Post, MLA Rohit Pawar, Shivsena, BJP Maharashtra, Vidhansabha Election 2019

मुंबई: एनसीपीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेना-भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या आधीच इतकी भांडणं मग पुढे काय होणार, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. दोन्ही पक्ष राज्यातील जनतेला निराश करत असल्याचेही रोहित यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

‘महाराष्ट्राला असे अनेक नेते लाभले आहेत ज्यांच्याबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला, आदरणीय स्व.बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक. माझ्यामनात बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आदर असण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन. निवडणूकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल असा शब्द शिवसेनेला देवून देखील सध्या भारतीय जनता पक्ष ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे हे बघता प्रश्न पडतो की आज जर स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असत का?

तसेच राज्याचा एक नागरिक म्हणून सरकार स्थापनेला होत असणारा उशीर मला चिंताग्रस्त करत आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आमच्या आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला, आम्ही त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो आहे मात्र भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरू असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे असा आरोप रोहित पवार यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्षावर केला आहे.

राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करुन सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. सत्ता स्थापनेला होत असलेला उशीर पाहून एक नागरिक म्हणून चिंताग्रस्त आहे. राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला, आम्ही त्याचा स्वीकार करुन कामाला देखील लागलो आहोत. मात्र भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरु असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#NCP(296)#RohitPawar(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x