5 August 2021 5:14 PM
अँप डाउनलोड

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार | खा. नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित

MP Narayan Rane

मुंबई, ०६ जुलै | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपचे संघटन महामंत्री बी.एल.संतोषही उपस्थित होते. मंत्रिमंडळातील विस्तारासंदर्भात ही बैठक होती, असे सांगितले जाते. विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहेत. नियमानुसार मंत्र्यांची संख्या ८१ पर्यंत वाढवता येऊ शकते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी बुधवार, ७ जुलै रोजी होऊ शकतो. अर्थात याबाबत अद्याप अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नाही. परंतु विस्तार झाल्यास पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील हा पहिलाच विस्तार आहे.

या बदलामध्ये आसाममधून सर्बानंद सोनोवाल, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे आणि बिहारमधून माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने उत्तर प्रदेशला झुकते माप मिळण्याची शक्यता असून वरुण गांधी, रामशंकर कठेरिया, अनुप्रिया पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे सांगितले जाते.

नारायण राणेंना दिल्लीहून तातडीचं बोलावणं आले असून राणे आजच दिल्लीला रवाना होतील. ते दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राणेंनी या विषयावर काम केलं. आताही ते या मुद्द्यावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. याशिवाय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. त्याचा विचार करूनही राणेंना मंत्रिपद देण्यात येईल असं बोललं जातं.
.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: PM Narendra Modi and Amit Shah meeting discussion over cabinet expansion news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(99)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x