राणे आणि त्यांची मुलं कुणाचीही लायकी काढणं आणि खाली पाडून बोलण्यात धन्यता मानतात

मुंबई, २६ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
एक बेडूक आणि त्याची दोन पोरं:
तुम्हाला माहिती एक गाणं होतं. त्यानुसार आता मी म्हणतो की, ‘बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला, वाघाची डरकाळी पाहून लपला.’ या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला आणि त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतो. पण काय तो आवाज… नुसता चिरका.. तुम्हाला आताच सांगतो वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर तो काय मांजरासारखा शेपूट फिरवत बसणार नाही. फटका मारणारच.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता नारायण राणे आणि त्यांच्या पुत्र्यांवर टीका केली होती.
दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड होती. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केले आणि कोणी मारले, हे लवकरच बाहेर येईल. त्यामध्ये एक मंत्री आत जाईल तो मुख्यमंत्री पूत्र आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला.
कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. ही मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी नाही का? पंतप्रधानांच्या कामाबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्र सांभाळावा. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, भाषणात कॉमा वापरत नाहीत, फुलस्टॉप वापरत नाहीत. दाणवेंचा बाप काढतात तो पण दिल्लीत. गोमुत्र, शेण रेशनवर सुरु केले का? अशी भाषा वापरू नये. तुम्ही ही भाषा सोडली नाही आणि आमचा जर तोल गेला तर महागात पडेल. साहेबांकडे पाहून आम्ही शांत आहोत, असा इशारा दिला.
मात्र नारायण राणेंच्या या विधानावरुन आता शिवसेना देखील आक्रमक होतं उत्तर देत आहे. नारायण राणे यांनी आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. नारायण राणे ज्या संस्कृतीत वाढले त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार? ते अशाच पद्धतीने बोलतात. संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे. ते आणि त्यांचे मुलं कुणाचीही लायकी काढणं, खाली पाडून बोलणं यामध्ये धन्यता मानतात, असं शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांना शेलक्या भाषेत, एकेरी बोलले. हे महाराष्ट्राच्या जनतेला न आवडणारं आहे. तुम्ही चुका असतील तर योग्य पद्धतीने मांडा. चुका लक्षात आणून द्या. त्यांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारावर अशाप्रकारे भाषण केलं, याची एनसीबीने चौकशी केली पाहिजे, अशी भूमिका घेतली अर्जून खोतकर यांनी मांडली आहे.
News English Summary: Shiv Sena is now responding to Narayan Rane’s statement. Narayan Rane should be aware of what we are talking about. What else will Narayan Rane expect from the culture in which he grew up? They speak in the same way. The whole of Maharashtra has an idea. Shiv Sena leader Arjun Khotkar while talking to TV9 Marathi said that he and his children consider it a blessing to be able to demean anyone.
News English Title: Shivsena leader Arjun Khotkar slams MP Narayan Rane after statement on CM Uddhav Thackeray News Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL