30 April 2025 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; १० जणांवर गुन्हा दाखल

Solhapur Gang rape

सोलापूर: हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नसतानाच सोलापूर इथं एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ ती रडत बसली असताना एका नागरिकाने पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. जुलै महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचं मुलीच्या चौकशीतून समोर आलं.

अल्पवयीन मुलगी जून महिन्यापासून रिक्षाने कॉलेजला येत होती. नेहमीच्या जाण्या-येण्यातून एकेदिवशी त्याने अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनंतर दुसऱ्या एका रिक्षाचालकाने तिच्यासोबत असाच प्रकार केला. तिसºया रिक्षाचालकानेही असाच प्रकार केला. परंतु, काही दिवसांनंतर त्याने त्याच्यासोबतच्या ४ ते ५ मित्रांसमवेत अळीपाळीने अत्याचार केला होता. दीड महिन्यापूर्वी तिच्यावर निर्जन ठिकाणी सामूहिक अत्याचार झाला होता.

दरम्यान, तिच्यावर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झाल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अत्याचार करणाºयांची माहिती घेऊन शोध घेतला. माहिती मिळालेल्या आरोपींपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दहा जणांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कलम ४, ६, ८ १0, भादंवि कलम ३७६-ड आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे करीत आहेत.

 

Web Title: Solhapur 5 arrested after Gang rape on minor college girl.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या