2 May 2025 2:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

केंद्राने सुरुवातीला भारतातील कोरोना लस परदेशात पाठवली, त्यामुळे भारतात तुटवडा निर्माण झाला - उपमुख्यमंत्री

Vaccination

मुंबई, १ मे | सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी लसींचे डोस मागितले आहेत. मात्र, आतापर्यंत आपल्याला फक्त 3 लाख डोस मिळाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने लसीकरण करण्याचा मनसुबा राज्य सरकारला अंमलात आणता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार सिरम आणि परदेशी कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनास्थिती तसेच उद्यापासून देशभरात सुरु होणाऱ्या लसीकरणावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल (३० एप्रिल) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. आज (१ मे ) महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी या संवादला सुरुवात केली.

तसेच, आजपासून म्हणजेच १ मे महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ या वयोगटाच्या सगळ्यांच्याच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. केंद्राकडून लसीचा साठा येत आहे. आणि जसजशी लस उपलब्ध होत राहील तशी ही संख्या वाढवणार आहोत. यावेळी उद्धव ठाकरेंनी लसीकरण सेंटरला कोविड सेंटर करु नका अशी विनंतीही केली आहे. पुढे ते असंही म्हणाले की, ही पहिली लस आहे शेवटची नाही. त्यामुळे संय्यम बाळगण्याची विनंतीही केली आहे.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar said that if the corona vaccine made in India in the early days had been used by the central government for its own citizens without being sent abroad, there would have been no shortage of corona vaccines today.

News English Title: State deputy CM Ajit Pawar criticized Modi govt over exporting corona vaccine in initial stage news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या