स्वतःच्या जीव धोक्यात घालणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा व पोलिसांचा पगार का कापता?
मुंबई, ३१ मार्च : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात मोठी घट झाली आहे. करोना’चं संकट आणि ‘टाळेबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘करोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सर्वाधिक आहेत. हे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
मात्र यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “स्वतःचा जीव धोक्यात घालून २४ तास राबणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांचे पगार कसले कापता, उलट त्यांना अधिक पैसे प्रोत्साहन म्हणून द्यायला हवे… झालं तर आमदारांचे पगार १०० टक्के कापा असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Why is Maharashtra Gov cutting salaries of Police and health department workers and officers.. they r the ones who r risking their lives n working overtime for us!
They can cut 100% of our MLA s salaries but do not cut salaries of Police men and health workers!
Give them extra!— nitesh rane (@NiteshNRane) March 31, 2020
मात्र सरकारच्या या निर्णयामुळे मात्र वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराचा खर्च भागाने देखील कठीण होणार यात शंका नाही. परंतु सरकारने पत्रकार परिषदेत कामाची स्तुती करताना आम्हाला आमच्या घरचा महिन्याचा किराणामाल सुद्धा खरेदी करता येणार नाही हे आधी लक्षात घ्याल हवं असं अनेक पोलिसांनी मत व्यक्त केलं आहे.
This is the time 2 boost their morale and not demotivate them!
They r risking their lives for us..v need 2 atleast ensure that their families r taken care of properly!
I m gettin a lot of messages from police men and health workers..this is not the right stage to disturb them!— nitesh rane (@NiteshNRane) March 31, 2020
News English Summary: To overcome the health and economic conditions created by the outbreak of ‘Corona’, all the representatives of the people from the Chief Ministers, Deputy Chief Ministers, members of the Legislature and local Swaraj Institutions will be given a 60 percent reduction in wages in March and they will be paid 40 percent. But BJP MLA Nitesh Rane has expressed his anger over this. He tweeted, “Medical staff and policemen who spend 6 hours risking their own lives should be paid, rather they should be given more money as incentives … but they have also said that the MLA’s salary should be 100 percent deducted.”
News English Title: Story BJP MLA Nitesh Rane criticized State Government after decision over cutting salary News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या