28 April 2024 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

VIDEO- प्रतिभाताई पवार यांचे जुने निवृत्त पोलीस अंगरक्षक संकटात; मदतीसाठी मनसेकडे विनंती

MNS Raj Thackeray, Sharad Pawar, PratibhaTai Pawar, Mumbai Police, MNS Tulsi Joshi

पालघर: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत मनसेच्या महामोर्चावर भाष्य करताना राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं विधान केलं होतं. मात्र निकाट्याच एका विषयावरून असच म्हणावं लागेल की सामान्य मराठी माणसं संकटाच्या काळात राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनाच गांभीर्याने घेतात. अगदी ती सामान्य माणसं काही काळासाठी का होईना पवार कुटुंबियांच्या सहवासात वावरलेली का असेना.

कारण मुंबई पोलीस दलातील निवृत्त पोलीस कर्मचारी अशोक दत्तात्रय सोनटक्के यांची विवाहित कन्या अश्विनी वैभव पाटील हिने स्वतः एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करून संपूर्ण घटनाक्रम सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी अशोक दत्तात्रय सोनटक्के त्यांच्या सेवाकाळात तब्बल १० वर्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांचे अंगरक्षक होते. त्यानंतर ते काही काळ मातोश्री बंगल्याच्या सुरक्षेवर देखील तैनात होते. अर्थात यात त्यांनी या दोन्ही पक्षांबद्दल किंवा व्यक्तींबद्दल तक्रार केली नसून केवळ स्वतःची ओळख करून देण्यासाठी ती माहिती दिली आहे.

अशोक सोनटक्के २०१७ साली निवृत्त झाले मात्र २००२ पासूनच ते स्वतः काही आरोग्याच्या समस्या झेलत आहेत. निवृत्तीनंतर मिळालेल्या सर्व रकमेतून त्यांनी मुंबईपासून दूर एक स्वतःचे घर घेण्यासाठी गुंतवली आणि त्यासाठी त्यांनी सेवकाळातील सर्व पैसा म्हणजे तब्बल १९ लाख एवढी रक्कम एका बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पात गुंतवले आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाने त्यांना ३-४ महिन्यात घर देण्याची तोंडी हमी दिली असं त्यांच्या मुलीने म्हटलं आहे.

मात्र निवृत्तीनंतर मुंबईत राहण्यासाठी स्वतःच्या मालकीचा कोणताही पर्याय उपलब्द नव्हता आणि सरकारी घर देखील नियमाप्रमाणे ३-४ महिन्यात खाली करावे लागणार होते. तसेच इतरत्र भाडं देऊन घर घेणं परवडणारं नव्हतं. ते सध्या स्वतःच घर नसल्याने मागील ३ वर्षांपासून भाड्याने राहत असून बांधकाम व्यावसायिक ना भाड्याचे पैसे देत ना स्वतःच्या हक्काच्या घर. त्यामुळे अशोक सोनटक्के यांचं कुटुंब अत्यंत काळजीत असून वडिलांची संपूर्ण सेवाकाळात बचत म्हणजे १९ लाख देखील मिळेनासे झाल्याने आणि संबंधित बांधकाम व्यावसायिक ना रक्कम परत देत ना घर अशा मोठ्या संकटात सोनटक्के यांचं कुटुंब अडकले आहे. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी पालघर येथील राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांना या विषयात मदतीसाठी विनंती करत एकप्रकारे राज ठाकरे यांच्या पक्षाकडूनच मदतीची अपेक्षा केली आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे मनसेचे महाराष्ट्र सैनिक नेमकी कोणती भूमिका घेत अशोक सोनटक्के यांची मदत करणार ते पाहावं लागणार आहे.

काय आहे तो नेमका व्हिडिओ;

 

Web Title: Story Sharad Pawars Wife Past Bodyguard and retired Mumbai Police asked help from MNS Party.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x