28 March 2024 8:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

मुस्लिम धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावलेले पुण्यातील ६० लोक विलगीकरणात

Corona Crisis, Covid 19, Nizamuddin Markaz

नवी दिल्ली, १ एप्रिल: निजामुद्दीनमधील तबलिग जमात मरकजच्या मौलानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारच्या आदेशांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदीचे आदेश देऊनही आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना असतानाही त्या न पाळल्याचा मौलानांवर आरोप आहे.

दिल्लीतील निझामुद्दीन तबलिगी मर्कझ येथील धार्मिक कार्यक्रमात पुण्यातील १३० हून अधिक लोक उपस्थित होते, आतापर्यंत यातल्या ६० लोकांना शोधून विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या १३० पुण्यातील लोकांचा शोध घेतला जात आहे त्यातले अनेक लोक हे सध्या पुण्यात नाही किंवा त्यांचा शोध लागत नाही अशीही माहिती त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील काहीजण यात सहभागी झाले होते. त्यापैकी ६० जणांना जिल्हा प्रशासनानं क्वारंटाइनमध्ये ठेवलं आहे. त्यापैकी कुणालाही करोनासदृश्य लक्षणं दिसून आलेली नाही. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. इतरांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या ६० लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाही, मात्र त्यांचे टेस्ट सॅम्पल पाठवण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे, तर उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे असंही ते म्हणाले.

 

News English Summary: Police have registered a crime against the Maulana of the Tablig tribe, Nizamuddin. They have been accused of violating government orders and organizing large scale religious programs. Moulana has been accused of not following the government’s orders to mobilize against the Corona virus and despite instructions on social distancing. More than 130 people from Pune attended the religious event at Nizamuddin Tabligi Merkaz in Delhi, so far 60 people have been traced and detained, Pune District Collector Naval Kishore Ram said. He said while talking to ANI news agency that 130 Pune people who are attending religious programs are being searched.

 

News English Title: Story till now 60 people from Pune have been put under quarantine in connection with Nizamuddin Markaz News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x