15 December 2024 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, मुख्यमंत्र्यांची टीका

Covid 19, Corona Crisis, CM Uddhav Thackeray

मुंबई, २६ एप्रिल : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊनच्या काळात सहकार्याबद्दल सर्वधर्मियांनांचे आभार मानले आहेत. आपले सण आपापल्या घरात राहूनच साजरे करा. आता रमजानचा महिना आहे. घरात राहूनच नमाज पडा अशी विनंती व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केलं आहे. सण बाजूला ठेवून देशाला प्राधान्य दिलं जातंय हे समाधानकारक आहे.

देव हा आता मंदिरात नाही तर संयमात आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, सफारी कर्मचारी आणि यामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांमध्ये देव आहे. सर्व कोरोना योद्धांचा आदर करा. ते खूप तणावाखाली काम करत आहेत. संकटाच्या काळातही काहीजण राजकारण करत आहेत. घाणेरडं राजकारण सुरु आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाचे नाव न घेता केली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. गडकरी यांनी राजकारण बाजूला ठेऊन मदत केली, असे ते म्हणाले.

राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. “लॉकडाउनमुळे करोनाचा गुणाकार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. करोनाची वाढ आपण काही प्रमाणात नियंत्रणात ठेवली आहे. स्वतःचं घरदार स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून, ते करोनाचं युद्ध आपल्यासाठी लढत आहेत. म्हणून पोलीस काय करत होते, असा संशय व्यक्त करण्यापेक्षा तत्कालीन स्थितीचा एकदा विचार करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. “या लढाईत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांनी मी आंदराजली वाहतो,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.

 

News English Summary: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray interacted with the people today. All religions are thanked for their cooperation during the lockdown. Celebrate your festival from the comfort of your own home. Now is the month of Ramadan. He has requested to pray while staying at home.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray slams opposition for doing politics in corona virus crises covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x