13 July 2020 1:28 PM
अँप डाउनलोड

अब की बार..सतत इंधन दरवाढ...काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन

Petrol Diesel, Price Hike

मुंबई, २९ जून : ७ जूनपासून सलग होणाऱ्या इंधन दरवाढीला रविवारी ब्रेक लागला. मात्र आज सोमवारचा दिवस उजाडताच या दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. देशभरात मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावलेले असतानाच दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीनेही सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज सकाळी १० ते १२ या वेळत सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या नावे एक निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते ४ जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करुन केला जाणार आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

तसेच सोशल डिस्टन्स ठेवून आणि मास्क लावूनच आंदोलन करण्याच्या सुचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आंदोलनाच्या दिवशी #SpeakuponPetroleumPrices ही ऑनलाईन मोहिमही सोशल मीडियावर चालवली जाणार असून जनतेने या माहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसही प्रदेशाध्यक्षांनी केले होते.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात पाच पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ५३ पैसे झाला आहे. इंधनाचे दर रोज वाढत असताना रविवारी मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता.

मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत पाच पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे.

 

News English Summary: The daily increase in fuel prices has also broken the backs of the general public. The Congress party is going to launch a statewide agitation against this today.

News English Title: The Congress party is going to launch a statewide agitation against today against petrol diesel price hike news latest updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Petrol Price(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x