1 May 2025 8:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

राहुल गांधी म्हणजे देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड | दानवेंनी विखारी टीका

Raosaheb Danve

औरंगाबाद, २० ऑगस्ट | केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज बदनापुरात पोहोचली. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका केलीय. दानवे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड असा केला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता पेटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, दानवे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी म्हणजे देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड,  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी विखारी टीका (Union minister Raosaheb Danve criticizes Congress MP Rahul Gandhi) :

एखाद्या देवाला आपण गोरं सोडतो ना, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? असा प्रश्न दानवेंनी विचारला. त्यावेळी सांड असं उत्तर उपस्थितांकडून देण्यात आलं. ते काय करतं त्याला म्होरकी नसती, त्याला वेसण नसती. त्याला ठिकाणाही नसतो कुठं बांधायचं झालं तर. कारण त्याला मालकच नसतो. ते कुणाच्याही शेतात जातं आणि खातं. शेताचा मालकही म्हणतो जाऊद्या खाऊद्या, ते तरी कुठं जाईल खायला. आणि खाऊन मग कसा लठ्ठ्या होतो, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय. (Raosaheb Danve criticized Rahul Gandhi)

नाना पटोलेंच प्रतिउत्तर:
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दानवेंवर जोरदार टीका केलीय. अशा प्रकारचं वक्तव्य करायचं आणि त्यातून लोकांचं मनोरंजन करायचं. पण रिकामं पोट मनोरंजन घडवू शकत नाही. आज बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाई आहे. या सगळ्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीका पटोले यांनी केलीय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union minister Raosaheb Danve criticizes Congress MP Rahul Gandhi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RaoSahebDanve(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या