30 April 2025 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
x

वंचित आघाडी ३० जुलैला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

Vanchit bahujan aghadi, Prakash Ambedkar, MIM, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत केवळ एका जागेवर विजय प्राप्त करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आघाडीच्या सर्व चर्चांकडे दुर्लक्ष करत आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच २८८ जागांवरील उमेदवारांच्या चाचपणी प्रक्रियेवरील जोरदार चक्र सध्या फिरताना दिसत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी एमआयएम’ने विधानसभेच्या तब्बल शंभर जागांची मागणी करत संभाव्य उमेदवारांची संपूर्ण यादीच प्रकाश आंबेडकरांकडे सुपूर्द केली होती.

महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी जोरदारपणे कामाला लागली आहे असंच म्हणावं लागेल. दरम्यान मोर्चेबांधणीत आणि काँग्रेस आघाडीवर दबाव वाढविण्याच्या बाबतीतही वंचित आघाडीने बाजी मारली असून उमेदवारांची पहिली यादी येत्या ३० जुलैला अधिकृतपणे जाहीर होणार असल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना वंचित आघाडीकरत तिसरा पर्याय निर्माण उपलब्ध करून दिला होता. मात्र याचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील वंचित आघाडीचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसणार असल्याची शक्यता आहे.

येत्या ३० जुलैला वंचित आघाडी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. या यादीत नव्या दमाच्या उमेदवारांचा समावेश असणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत वंचीतच्या उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकाची मत मिळवली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नक्कीचं उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास वंचित आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी ही कॉंग्रेस आघाडीला अडसर ठरली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीला कॉंग्रेस आघाडीत घेण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसकडून मांडण्यात आला होता. परंतु कॉंग्रेसच्या प्रस्तावावर वंचीत आघाडी फारशी इच्छुक नसल्याच दिसत आहे. त्यामुळे वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याच जवळपास निश्चित झाल आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या कोणत्याही चर्चेकडे पूर्णपणे कानाडोळा करत प्रकाश आंबेडकर त्यांची राजकीय रणनीती जोरदारपणे आखात आहेत असंच म्हणावं लागेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादी अजूनतरी निद्रावस्थेत असल्याचं म्हणावं लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MIM(30)#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या