25 April 2024 8:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

वंचितांच्या कल्याणासाठी प्रकाश आंबेडकरांच्या लढ्याला नक्कीच यश मिळणार: अण्णाराव पाटील

Advocate Annarao Patil, VBA, Prakash Ambedkar, MIM, vanchit Bahujan Aghadi

लातूरः भटक्‍या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने आणि आमच्यात काही मतभेद नक्की आहेत, परंतु मनभेद अजिबात नाहीत. माने आज देखील पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, पक्षाने त्यांना आद्यप देखील काढलेले नाही, तसेच पक्षापासून ते अलिप्त नाहीत. परंतु त्यांनी केलेले आरोप हा केवळ स्टंट बाजीपणाचा प्रकार होता, अशी टीका वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर केली. लातूर येथे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली.

पुढे ते म्हणाले की, प्रकाश आंबडेकरांची विचारधारा केवळ वंचितांच्या कल्याणाची आहे, ते यासाठी मोठा लढा देत आहेत. त्यामुळे लोकांचा आम्हाला मोठा प्रतिसाद मिळतोय. लोक आमच्या मागे येत आहेत. प्रकाश आंबेडकर हा लढा यशस्वी करून दाखवणार. त्यांना यात नक्कीच यश मिळेल असा थेट दावा देखील त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केला.

यावेळी त्यांनी काँग्रेसला देखील लक्ष केले. कॉंग्रेसने देखील आमच्यावर भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा खुलेआम आरोप केला. त्याचाही काही परिणाम झाला नाही. उलट काँग्रेसचेच मोठे नुकसान झाले. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसकडे एकूण ४० जागांची मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून अजूनपर्यंत कोणताही होकाराम्तक प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे आम्ही आता कोणतीही प्रतीक्षा न करता स्वबळावर लढण्यास सज्ज झालेलो आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीच्या दृष्टीने संपूर्ण राज्याचा दौरा सुरु आहे.

विदर्भाचा दौरा पूर्ण झाला, आता मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या मुलाखती झाल्या. वंचित बहुजन आघाडीला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतो आहे. उमेदवारी देतांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक कामात अग्रेसर असलेल्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगतांनाच अऩेक राजकीय पक्षाचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा अण्णाराव पाटील यांनी यावेळी केला. राज्यातील ३६ जिल्ह्यात आमचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. आमचे नेटवर्क तयार झाले आहे. वंचितांना न्याय देण्याची भूमिका राज्यातील जनतेला पटली आहे. विषमता नष्ट करून समानता आणण्याचा आमचा विचार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा पडल्या तर, त्याच्या थेट फायदा हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला झाल्याचं आकडेवारी स्पष्ट सांगते. तसेच लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या सभांना देखील भाजपने पैसा पुरवल्याचा दावा अनेकांनी केला होता. लोकसभा निवडणुकीत लढवून देखील वंचित आघाडीने केवळ औरंगाबादची जागा जिंकली होती आणि त्याला देखील स्थिक राजकीय समीकरणं जवाबदार होती. प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत स्वतः प्रकाश आंबेडकर दोन जागांवरून लढले तरी पराभूत झाले आणि सोलापूरच्या जागेवर तर ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले अशी अस्वथा झाली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी देखील मुस्लिम समाजाची मतं पडली नसल्याचा आरोप एमआयएम’वर केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीवर पुन्हा तोच आरोप होऊ लागला आहे.

मात्र असं असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आणि आजी-माजी आमदार भारतीय जनता पक्षापेक्षा वंचित आघाडीत प्रवेश करणं पसंत करत असल्याने भाजपाची आणि त्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीची देखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यादाच वंचित बहुजन आघाडीने सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस वंचितनं राज्यभरात आपलं जाळं पसरवलं. वंचित बहुजन आघाडी ही नॉन हिंदू विचारधारेची असल्यामुळे हिंदूंचा पुरस्करता या आघाडीकडे भटकणार नाही, परंतू पुरोगामी विचारांचं लेबल असणारी कॉंग्रेस एनसीपीच्या नेत्यांनी वंचितकडे धाव घेणे सहज शक्य आहे.

हॅशटॅग्स

#MIM(30)#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x