30 April 2025 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

मनसेचा गुढीपाडवा मेळावा, अयोध्या राम मंदिरसंबंधित प्रसिद्ध सनई वादक पंडित लोकेश आनंद मेवातींची सनई शिवतीर्थावर

मनसेचा गुढीपाडवा मेळावा, अयोध्या राम मंदिरसंबंधित प्रसिद्ध सनई वादक पंडित लोकेश आनंद मेवातींची सनई शिवतीर्थावर

Raj Thackeray | दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबई शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवार, ३० मार्च रोजी दादर शिवाजी पार्क येथे ‘पाडवा मेळावा’ आहे. त्यानिमित्ताने मुंबईत वाहतूकीत देखील काही बदल करण्यात येणार आहेत.

अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या वाहनांसह शिवाजी पार्कला दाखल होणार
या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या वाहनांसह शिवाजी पार्कला दाखल होणार आहेत. दरम्यान, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व दुतगती महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने येणार असल्याने विशेषतः कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. शहरातील नागरिकांना आणि वाहन चालकांना होणारा अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी मुंबई आणि दादर भागातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

मनसे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर
मागील काही महिन्यांपासून मनसेचा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर अधिक भर असल्याचं पाहायला मिळतंय. त्याच हिंदुत्वाचा धागा पकडून बोलायचे झाल्यास. भारतात हिंदूंच्या लग्न आणि इतर शुभकार्यात भारतरत्न पंडित बिस्मिल्ला खान यांची ओळख असलेल्या सनईचा मधूर आवाज घुमतोच. दरम्यान, अयोध्या मध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठा समारंभात प्रसिद्ध सनई वादक पंडित लोकेश आनंद मेवाती यांनी सनई वाजवून मंगल ध्वनीने वातावरण आणखी प्रसन्न केले होते.

थेट अयोध्या ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी
आता तेच पंडित लोकेश आनंद ३० मार्च रोजीच्या गुढी पाडवा तथा हिंदु नववर्ष दिनी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यापूर्वी शिवतीर्थावर सनई वाजवणार आहेत. विशेष म्हणजे मनसे पालघरचे कट्टर ‘राज भक्त’ आणि सामान्य लोंकांचे प्रश्न मार्गी लावण्यात परिचित असलेले मनसैनिक तुसली जोशी यांच्या विनंतीला मान देत पंडित लोकेश आनंद मेवाती थेट अयोध्या ते राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे सनई वादनातून मंगल ध्वनीने वातावरण आनंददायी करतील. तसेच गुढीपाडवा निमित्ताने शिवतीर्थ परिसरात हत्तीवरुन साखर देखील वाटण्यात येणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या