अरेंज मॅरेज करताना ह्या ५ गोष्टींची काळजी घ्या | नाहीतर पुढे पश्चात्ताप करायची वेळ येईल

मुंबई, १४ जून | सध्याच्या लव्ह मॅरेजच्या जमान्यात आजही अनेक जण असे आहेत जे अरेंज्ड मॅरेजवर विश्वास ठेवतात. खासकरून मुली ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य करियरला वाहीलेलं असतं, त्यांना अजिबात प्रेमात पडायला वगैरे वेळ मिळालेला नसतो किंवा आई वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न करायचं नसतं, त्या मुलींची अरेंज्ड मॅरेज करून छानसा जोडीदार निवडायची इच्छा असते. शेवटी लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय असतो. हा निर्णय चुकला तर सगळं आयुष्य उध्वस्त होऊ शकतो. म्हणूनच त्या आधी काही शहानिशा करून मग सारासार विचार करून निर्णय घेतलेला योग्य.
अरेंज मॅरेज ही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही , बालपणापासून आपण अरेंज मॅरेज बघत असतो. ज्यात दोन एकमेकांना पुर्णपणे अनोळखी असलेले लोक, एकमेकांसोबत आयुष्यभराच्या गाठी बांधतात. हे अरेंज मॅरेज तेव्हाच होतं जेव्हा मुलगा/ मुलगी स्वतःहून लग्न करण्यास असमर्थ असतात. अश्यावेळी त्यांचे पालक त्यांचासाठी सुयोग्य जोडीदार शोधतात. असा जोडीदार जो आयुष्यभराची साथ निभावणार आहे. ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे.
परंतु नवीन आयुष्याची सुरुवात करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्याची काळजी लग्न करण्याआधी घेतली पाहिजे. तर आज आपण त्या पाच गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या अरेंज मॅरेज करण्यापूर्वी डोक्यात ठेवल्या पाहिजे. जेणेकरून पुढील आयुष्य सुख आणि समाधानात जाईल.
अरेंज मॅरेजसाठी भाग्यविवाह या वेबसाईटवर मोफत नोंदणी करा आणि करा आयुष्याच्या जोडीदाराचा शोध. : https://t.co/SfhR3lc2L2
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) June 14, 2021
१ ) एकमेकांना वेळ द्या:
बहुतांश विवाह हे मॅट्रीमोनिअल साईट्स, नातेवाईक यांचा भेटीतून जुळतात. जर तुम्ही एखादया मुलीला लग्नाची मागणी घातली आणि तिच्या घरच्यांनी होकार जरी कळवला. तरी तुम्ही तिला पुरेसा वेळ द्या. तिच्याशी बोला. बऱ्याचदा मुली घरच्यांचा दबावाखाली लग्न करतात. अश्यावेळी मुलीशी बोलत राहिलं पाहिजे. ती नात्यासाठी, पुढील वाटचाली योग्य आहे का हे ठरवलं पाहिजे. एकमेकांसोबत वेळ घालवला पाहिजे, एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे मग काय तो निर्णय घेतला पाहिजे
२ ) त्याच्या / तिच्या घरच्यांसोबत वेळ घालवा:
भारतात असं म्हटलं जातं की लग्न हे केवळ दोन लोकांचं नसतं, तर ते दोन परिवारांचं असतं. त्यामुळे लग्नाच्या वेळी एकमेकांच्या परिवारासोबत वेळ घालवणे खूप महत्वाचे ठरते. यातून आपल्याला एकमेकांच्या परिवाराच्या स्वभावाची कल्पना येते,आवडी- निवडी समजतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आयुष्यभर या परिवारासोबत जुळवून घेऊ शकतो का याची कल्पना येते.
३ ) आर्थिक तडजोड:
पूर्वी लग्न झाल्यावर माणूस पैसे कमवायचा आणि स्त्री घरकाम करायची. आज देखील ती परिस्थिती बहुतांश असली तरी काळ बदलला आहे. स्त्री देखील स्वतःच्या पायावर उभी राहून नोकरी- व्यवसाय करू लागली आहे. सोबतच नवनवीन समस्या ही निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ महागाई, आज एका व्यक्तीच्या पगारात घर चालवणं शक्य नाही आणि कोणीच आकांशा व घेतलेल्या शिक्षणाला वाया जाऊ देत नाही.
स्त्री आणि पुरुष व्यवसाय आणि कमाईच्या बाबतीत स्वतंत्र असतात अश्यावेळी तुम्ही दोघांनी लग्नापूर्वीच आपल्या पगारातून कसे वाटे करायचे व पुढे कसे आर्थिक नियोजन करायचे यावर बसून चर्चा करणं गरजेचे आहे. असे केल्यास भविष्याची आखणी सोपी होते आणि पुढे जाऊन कोणा एकाच्या खांद्यावर जबाबदारी पडत नाही व वाद होत नाही त्यामुळे आर्थिक तडजोड आधी केलेली योग्य ठरते.
४ ) अस्तित्वात असलेल्या नात्याचं सत्य लपवू नका:
जर तुमची लग्न करण्याची तयारी नसेल. तुम्हाला आयुष्यात आजून काही मोठं करण्याचा मानस असेल अथवा कुठल्याही प्रकारच्या आकांक्षा असतील तर त्या तुमच्या जोडीदारासमोर दिलखुलासपणे मांडावयात. कुठलंही सत्य लपवू नका.
तुमचं आधीच कोणावर प्रेम असेल, तुम्ही लग्न करण्याचा मानसिकतेत नसाल तर ते दिलखुलासपणे मांडा, कुठलाही संकोच बाळगू नका कारण लपवल्याने गैरसमज पसरतात आणि या गैरसमजाचा अत्यंत वाईट परिणाम भविष्यात होत असतो.
५ ) आपला भूतकाळ लपवू नका:
कधीही आपल्या होणाऱ्या जोडीदारापासून आपला भूतकाळ लपवू नका, जेवढं जास्त तुम्ही दोघे एकमेकांशी राहाल तेवढा फायदा तुमच्या भविष्यात तुम्हाला होईल. तुम्ही तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात कोऱ्या पाटी प्रमाणे करू शकतात.
आयुष्यभर एकमेकांशी खरे राहू शकतात. तुमच्या भूतकाळातील चुका , प्रेम याबद्दल तुम्ही आधीच सांगितलं तर पुढे कुठलाच त्रास होणार नाही. जर भविष्यात भूतकाळ अचानक समोर आला तर खूप मनस्ताप सहन करावा लागू शकतो त्यामुळे आधीच मोकळंपणाने बोललेलं योग्य राहील.
जर नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी ह्या गोष्टी तुम्ही केल्या, तर तुमचं नात एकदम नव्या सारखं राहील आणि तुम्ही एकमेकांशी नवीन व अनोळखी असून सुद्धा आयुष्याची नवीन पाळी खेळू अत्यंत सुखासमाधानाने खेळू शकतात. कुठल्याही प्रकारचा मनस्ताप तुम्हाला भविष्यात सहन करावा लागणार नाही व आयुष्य प्रेमरंगाने रंगून जाईल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Few these things should know before arrange marriage Marathi Matrimony news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE