 
						2000 Notes Effect | आरबीआयच्या एका निर्णयाने पुन्हा एकदा लोकांच्या मनात पुन्हा नोटबंदीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल रात्री 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता आरबीआय यापुढे त्यांची छपाई करणार नाही. आरबीआयच्या या निर्णयामुळे ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना सर्वाधिक त्रास होत आहे.
कडक उन्हात सुट्ट्या काढून जनतेच्या बँकेत फेऱ्या
सुट्टीच्या दिवशी बँका बंद असतात आणि त्यामुळे कष्टकरी सामान्य जनतेला कामाची सुट्टी असेल तरी बँकेत जाऊन उपयोग होणार नाही. कालपासून बातमी पसरताच सामान्य लोकांची धावपळ सुरु झाली आहे. त्यात एकदिवसात किती नोटा बदलता येतील यावरही मर्यादा असल्याने एकदा जाऊन भागणार नाही. २० हजार रुपायांची रक्कम हा काही काळाबाजारी लोकांशी संबधित विषय नाही.
सामान्य लोकही ५०-६० हजार रुपये एखाद्या आपत्कालीन विषयाच्या अनुषंगाने एवढी रक्कम घरात ठेवतात. प्रत्येक कुटुंब काही महागड्या हेल्थ इन्शुरंस पॉलिसी घेत नाहीत, त्यामुळे घरात एवढी अनेकांच्या घरात असू शकते. मग तेच ५०-६० हजार रुपये बदलण्यास ३-४ फेऱ्या बँकेत माराव्या लागणार आहेत. बँकांच्या लाईनपासून, नाक्यावर ते घरा घरात या चर्चा रंगल्याने सत्ताधारी भाजपाला याची किंमत मोजावी लागेल असं म्हटलं जातंय. अनेकजण सुट्ट्यांमुळे गावी गेले असून या बातमीने त्यांच्या मनातही चलबिचल झाली आहे. कारण, बँक शहरात आणि खातेधारक गावात अशी स्थिती झाली आहे. वेळ असला तरी सामान्य लोकांच्या मनात घामाच्या पैशावरून विचार येणं थांबवता येतं नाही. कारण मागील नोटबंदीचा इव्हेन्ट करून नंतर काय झालं ते जनतेला ठेवूक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही लोकं राग व्यक्त करतील अशी शक्यता आहे.
लग्नकार्याच्या दिवसात सामान्यांना फटका
सध्या लग्नकार्याच्या दिवसात हा निर्णय आल्याने अनेकांनी खर्चासाठी तयार ठेवलेली रक्कम आता पुन्हा बदलण्यासाठी बँकेत धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे देखील सरकार विरोधात पुन्हा रोष वाढला आहे. मागील नोटबंदीवेळी सुद्धा अनेकांना हाच प्रकार अनुभवावा लागला होता. त्यामुळे याचा भाजपाला फटका बसणार असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
३० सप्टेंबरनंतर या नोटांचे काय होणार?
आरबीआयच्या म्हणण्यानुसार या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलता येतील. ३० सप्टेंबरपर्यंत २० रुपयांच्या नोटा जमा करता आल्या नाहीत तर? मुदतीनंतर या नोटा बदलल्या जाणार नाहीत/ बँकांमध्ये जमा केल्या जाणार नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, मुदतीनंतर लोकांना 2000 रुपयांच्या नोटा मिळाल्यास सध्या कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.
23 मे ते 30 सप्टेंबर पर्यंत बदलू शकतो
आरबीआयने म्हटले आहे की, लोकांनी 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत 2000 रुपयांच्या नोटा खात्यात जमा कराव्यात किंवा बँकांमध्ये जाऊन त्या बदलून घ्याव्यात. आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. याशिवाय केवायसी आणि इतर आवश्यक निकषांनंतर ही नोट कोणत्याही अडथळ्याशिवाय बँक खात्यात जमा करता येणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		