 
						3i Infotech Share Price | चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3i इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3i इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 43.30 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
3i इन्फोटेक कंपनीच्या शेअर्सचे बाजार भांडवल 730 कोटी रुपये आहे. 3i इन्फोटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 54.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 26 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी 3i इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.80 टक्के घसरणीसह 39.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
3i इन्फोटेक लिमिटेड ही आयटी क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. नुकताच या कंपनीने Insurmo सोबत भागीदारी करार केला आहे. InsureMo ही कंपनी जगातील टॉप विमा मिडलवेअर प्लॅटफॉर्म म्हणून ओळखली जाते. ही कंपनी विविध क्षेत्रातील कंपन्यांसोबत व्यावसायिक करार करून विमा उद्योगाच्या कार्यपद्धती बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. InsureMo सोबत भागीदारी केल्याने 3i इन्फोटेक कंपनीला आपल्या सेवांचा विस्तार करणे सोपे जाणार आहे.
3i इन्फोटेक कंपनी InsureMo च्या प्लॅटफॉर्मचे डिजिटल विमा, मिडल ऑफिस प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर करेल आणि त्यात विविध विमा कंपन्या, दलाल, एजंट, चॅनेल्स, विमा व्यवसाय तंत्रज्ञान, स्टार्टअप्स यांच्याशी सहकार्य करून व्यवसाय विस्तार करण्यावर फोकस करणार आहे.
3i इन्फोटेक कंपनीने ICICI बँकेची बॅक ऑफिस प्रोसेसिंग कंपनी म्हणून देखील काम हाताळते. या आयटी सोल्यूशन्स कंपनीचे दोन मुख्य व्यवसाय आहेत. 3i इन्फोटेक लिमिटेड कंपनी जगात 50 पेक्षा जास्त देशात कामकाज करते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुम्ही 3i इन्फोटेक कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. मागील 2 वर्षांत 3i इन्फोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 370 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		