 
						3M India Share Price| सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून लाभांश कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. या आठवड्यात 3M India Ltd ही कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्यातही एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहे.
थ्री एम इंडिया लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करणार आहे. थ्री एम इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसात फक्त 0.41 टक्के वाढ नोंदवली आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 28,057.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
थ्री एम इंडिया लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने बैठकीत आपल्या पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. या लाभांश वाटपासाठी थ्री एम इंडिया लिमिटेड कंपनीने 26 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. म्हणजेच ज्या शेअर धारकांकडे रेकॉर्ड तारीखपर्यंत कंपनीचे शेअर्स असतील, कंपनी त्यांना प्रत्येक शेअरवर 100 रुपये लाभांश देणार आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये थ्री एम इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.43 टक्क्यांच्या घसरणीसह 28,039 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात थ्री एम इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना फक्त 2.19 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23.80 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30.71 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		