9 October 2024 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

Nippon India Mutual Fund | खुशखबर, म्युच्युअल फंडाची नवीन योजना लाँच, किमान रु.1000 पासून गुंतवणूक करू शकता

Highlights:

  • Nippon India Mutual Fund
  • निप्पॉन इंडिया निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स फंड
  • शेअर्समधून फायदा घेण्याचा प्रयत्न – Nippon India Nifty 500 Momentum 50 Index Fund NFO
  • किमान 1000 रुपये गुंतवणूक करू शकतात
Nippon India Mutual Fund|

Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडची मालमत्ता व्यवस्थापक कंपनी निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडने एनएफओ लाँच केला आहे. या नवीन योजनेचे नाव निप्पॉन इंडिया निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स फंड असे ठेवण्यात आले आहे. हा NFO 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा फंड एक ओपन एंडेड स्कीम असून तो निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्सलां फॉलो करेल.

निप्पॉन इंडिया निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स फंड – 
निप्पॉन इंडिया निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स फंडाचे उद्दिष्ट भारताची गुंतवणूक वाढीची क्षमता अनलॉक करणे आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड हा निष्क्रियपणे व्यवस्थापित करण्यात येणारा इंडेक्स फंड आहे, जो निफ्टी 500 मोमेंटम 50 TRI च्या कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

शेअर्समधून फायदा घेण्याचा प्रयत्न – Nippon India Nifty 500 Momentum 50 Index Fund NFO
गुंतवणूकदारांना निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्समध्ये समान प्रमाणात गुंतवणूक करता यावी आणि इक्विटी मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी एक वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण मार्ग प्रदान करण्यासाठी या म्युचुअल फंडाची रचना करण्यात आली आहे. हा म्युचुअल फंड अलीकडच्या काळात तुलनेने मजबूत तेजीत वाढलेल्या शेअर्समधून फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.

किमान 1000 रुपये गुंतवणूक करू शकता
निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड NFO मध्ये गुंतवणुकदार किमान 1000 रुपये जमा करून गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये लॉक इन पीरियड नाही. तसेच एक्झिट लोड देखील नाही. निफ्टी 500 मोमेंटम 50 TRI हा या योजनेसाठी बेंचमार्क मानला जातो. हा NFO लाँच करताना निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचे सीईओ संदीप सिक्का यांनी माहिती दिली की, निप्पॉन इंडिया निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स फंड लाँच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा म्युचुअल फंड भारतीय शेअर बाजारातील टॉप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल.

Latest Marathi News | Nippon India Mutual Fund 15 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Nippon india mutual fund(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x