15 December 2024 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Droneacharya Share Price | शेअर प्राईस 54 रुपयांवरून 142 रुपयांवर पोहोचली, आता पुन्हा रॉकेट स्पीडने कमाई होणार - Marathi News

Highlights:

  • Droneacharya Share Price – ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनी अंश
  • शेअर प्राईस 54 रुपयांवरून 142 रुपयांवर
  • शेअरने किती परतावा दिला – Droneacharya Aerial Innovations Share Price
  • IPO 243 पट अधिक सबस्क्राइब झाला होता
Droneacharya Share Price

Droneacharya Share Price | ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 142 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारी हा स्टॉक 118.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 221 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 116.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 341 कोटी रुपये आहे. (ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनी अंश)

शेअर प्राईस 54 रुपयांवरून 142 रुपयांवर
ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचा आयपीओ 54 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स स्टॉक 19.98 टक्के वाढीसह 142 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचा IPO 13 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. हा IPO 15 डिसेंबर 2022 पर्यंत ओपन होता. 23 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते.

शेअरने किती परतावा दिला
या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आले आहे. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 33.97 कोटी रुपये होता. 2024 मध्ये ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये 25 टक्केपेक्षा जास्त घसरण झाली आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 191.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 142 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21 टक्के घसरली आहे.

IPO 243 पट अधिक सबस्क्राइब झाला होता
13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 178.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 142 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीचा IPO 243 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 330.82 पट तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 287.80 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा 46.21 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

Latest Marathi News | Droneacharya Share Price 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Droneacharya Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x