 
						3P Land Holdings Share Price | 3P लँड होल्डिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. रिअल इस्टेट आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या 3P लँड होल्डिंग कंपनीचे शेअर्स शुक्रवारी अफाट तेजीत धावत होते. आज मात्र हा स्टॉक लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. ( 3P लँड होल्डिंग कंपनी अंश )
शुक्रवारी 3P लँड होल्डिंग स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 55.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी 3P लँड होल्डिंग कंपनीचे शेअर्स 10.15 टक्के घसरणीसह 45.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील एका आठवड्यात 3P लँड होल्डिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 35 टक्के वाढली आहे. मागील तीन महिन्यांत 3P लँड होल्डिंग स्टॉक 77 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 150 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत.
3P लँड होल्डिंग कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 55.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 19.51 रुपये होती. ऑगस्ट 2023 पासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स 18.40 रुपयेवरून 150 टक्क्यांनी वाढले आहेत. या कंपनीची स्थापना 1965 साली झाली होती. 3P लँड होल्डिंग ही कंपनी मुख्यतः कंपनी कर्ज देणे, गुंतवणूक क्रियाकलाप आणि रिअल इस्टेट मालमत्ता भाड्याने देणे यासारखे व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		