14 December 2024 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

कोरोना काळात जग ठप्प असतानाही मुकेश अंबानींच्या संपत्तीत 24%, तर अदानींची संपत्ती दुप्पट

Mukesh Ambani, Gautam Adani, wealth increased, Corona crisis

नवी दिल्ली, ०२ मार्च: कोरोना महामारीमुळे एकीकडे देश आर्थिक संकटांचा सामना करत आहे, तर दुसरीकडे देशातील भांडवलदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2021 नुसार, कोरोना काळात भारतात 40 अब्जाधिशांची वाढ झाली आहे. यासोबतच अब्जाधिशांची संख्या 177 वर पोहचली आहे. या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2020 मध्ये 24% वाढ झाली आहे.

जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अंबानी 8 व्या नंबरवर:
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या या वार्षिक यादीमध्ये भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी 8 व्या क्रमांकावर आहे. रिपोर्टनुसार, अंबानीकडे 6.1 लाख कोटी रुपये (83 बिलियन डॉलर) ची संपत्ती आहे. या लिस्टमध्ये मागच्या वर्षी अंबानी 9 व्या स्थानी होते.

गौतम अडानींच्या संपत्तीत दुपटीने वाढ:
या रिपोर्टनुसार गुजरातमधील व्यापारी गौतम अडानी यांच्या संपत्तीत मागील काही वर्षापासून वेगाने वाढ झाली आहे. 2020 मध्ये त्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ होऊन 2.34 लाख कोटी (32 बिलियन डॉलर) झाली आहे. यासोबतच जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 45व्या स्थानी आले आहेत. IT कंपनी HCL चे शिव नडार 1.98 लाख कोटी (27 बिलियन डॉलर) संपत्तीसह भारतातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

 

News English Summary: The Corona epidemic has led to economic hardships in the country and a huge increase in the wealth of the country’s capitalists. According to the Hurun Global Rich List 2021, India has grown by 40 billionaires during the Corona period. With this, the number of billionaires has reached 177. According to the report, Mukesh Ambani’s wealth has increased by 24% in 2020.

News English Title: Mukesh Ambani and Gautam Adani wealth increased during Corona crisis in 2020 news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x