15 December 2024 7:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

देव देव्हाऱ्यात नाही...तिरुपती मंदिरातील १३०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली

Corona Crisis, Tirupati Balaji Temple, Jobless Employees

हैदराबाद, ३ मे: काही दिवसांपूर्वी सीआयआयनं केलेल्या एका सर्व्हेक्षणात देशातील ५२ टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला होता. तब्बल २०० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यादरम्यान ऑनालाइन पद्धतीनं सीआयआयनं सर्व्हेक्षण केलं होतं. CII सीईओ स्नॅप पोल’नुसार देशातील सर्वाधिक कंपन्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचं समोर आलं होतं. तसंच यामुळेच नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

सुरू तिमाहित आणि गेल्या तिमाहित बहुतांश कंपन्यांच्या उत्पन्नात १० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होतं. देशांतर्गत कंपन्यांचं उत्पन्न आणि नफा या दोन्हीमध्ये होत असलेल्या घसणीचा परिणाम देशाच्या जीडीपीवरही पडणार असल्याचं सीआयआयकडून सांगण्यात आलं. रोजगाराकडे पाहिल्यास संबंधित क्षेत्रांमध्ये ५२ टक्के नोकऱ्यांवर गडांतर येऊ शकतं असं सर्व्हेक्षणादरम्यान निरीक्षण समोर आलं आहे.

मात्र हे आर्थिक फटके देशातील मोठ्या आणि प्रतिष्ठित मंदिरांना देखील बसल्याने अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचा सपाटा लागण्याची शक्यता होती. मात्र देशातील सर्वात मोठ्या तिरुपती मंदिरालाच आर्थिक फटका बसल्याने इतर मंदिरांमध्ये देखील त्याचा प्रत्यय येऊ शकतो. त्यात सर्वाधिक कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी अधिक असतील असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनचा परिणाम देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थानलाही होत आहे. तिरूपती बालाजी मंदिरात काम करणाऱ्या १३०० कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना कायमची सुट्टी देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट ३० एप्रिलला संपले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने १ मे पासून कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यास मनाई केली आहे. दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या १३०० कर्मचाऱ्यांना १ मेपासून कामावर येणास नकार दिला आहे. मंदिर प्रशासनाने सांगितले की, लॉकडाऊनमुळे काम बंद आहे, त्यामुळे आता या १३०० कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट ३० एप्रिलपासून पुढे वाढवू शकत नाही.

तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून तीन गेस्ट हाऊस चालविण्यात येतात. या गेस्ट हाऊसची नावे विष्णु निवासम, श्रीनिवासम आणि माधवम अशी आहेत. नोकरीवरून काढण्यात आलेले हे सर्व १३०० कर्मचारी याच गेस्ट हाऊसमध्ये अनेक वर्षांपासून काम करत होते. लॉकडाऊनमुळे सर्व गेस्ट हाऊस बंद आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट वाढविण्यात आले नाही. तसेच, नियमित कर्मचाऱ्यांनाही सध्या कोणतेच काम सोपविण्यात आले नाही, असे तिरुपती बालाजी मंदिरचे अध्यक्ष व्हाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी सांगितले.हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, टीटीडी ट्रस्टचे प्रवक्ते टी. रवि यांचे म्हणणे आहे की, सर्व निर्णय कायद्यानुसार घेतले आहेत. काम बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे तिरुपती बालाजी मंदिर २० मार्चपासून बंद आहे. मात्र, मंदिरात रोज पूजा-पाठ पुजाऱ्यांकडून सुरु आहे. चालू आर्थिक वर्षासाठी या मंदिराचे बजेट ३३०९ कोटी रुपये आहे.

 

News English Summary: 1300 contract employees working in Tirupati Balaji Temple have been given permanent leave. The employees’ contracts expired on April 30. Since then, the temple administration has refused to renew the contract from May 1. Meanwhile, Tirupati Balaji Temple management has refused to hire 1,300 contract workers from May 1.

News English Title: Story Tirupati Balaji Temple the richest Hindu temple leaves 1300 workers jobless Corona virus outbreak News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x