12 December 2024 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

रेड झोनमधील (कंटेन्मेंट झोन वगळून) काय सुरू करण्यास परवानगी...सविस्तर

Lockdown, Covid 19, Corona Crisis, Liquor shops, Wine Shops

मुंबई, ३ मे: राज्य सरकारनं रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्राशी समन्वय राखून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मात्र रेड झोनमधील मॉल्स, सलूनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

त्यानुसार मुंबई, पुणे महानगर मध्ये रेड झोनमध्ये स्टँड अलोन दुकांनाना उद्यापासून परवानगी ( म्हणजे मॉल वगळता ) सिंगल शॉप दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली आहे. दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. स्टँड अलोनमध्ये एका लाईनमध्ये पाच पेक्षा जास्त दुकांनाना परवानगी नाही.

हरित, नारिंगी व लाल या तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) मद्यविक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे.

राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी रेड झोनमधील सुरू होणाऱ्या सेवांबद्दल पत्रकार परिषदेतून माहिती दिली. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्राच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता रेड झोनमधील (कंटेन्मेंट झोन वगळून) कपडे, चपला, इलेक्ट्रॉनिकची दुकानं सुरू होतील. स्पा, सलून, पार्लर यांच्याबद्दल मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. सलून, पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग असतो. गिऱ्हाईकांमुळे गर्दी होते. त्यामुळे अद्याप याबद्दल सरकारनं निर्णय घेतला नसल्याचं समजतं.

गृह मंत्रालयाने शुक्रवारी टाळेबंदीची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, हरित व नारिंगी क्षेत्रांमधील अनेक निर्बंध उठवले होते. ४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात हरित व नारिंगी क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.

News English Summary:

News English Title: Story corona virus lockdown state government decides allow liquor shops open red zone also except containment zones News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x