
7th Pay Commission | नवे वर्ष सुरू झाले आहे. आता आपण 2024 या वर्षात प्रवेश केला आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करत असाल, म्हणजेच तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर या वर्षी तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते.
यंदा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तर वाढेलच, शिवाय घरभाडे भत्ता अर्थात एचआरएमध्येही केंद्र सरकारकडून वाढ करण्यात येणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना यंदा दुहेरी आनंदाची बातमी मिळणार आहे. दरम्यान, केंद्र सरकार कडून महागाई भत्त्यात किती वाढ केली जाणार असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर? चला तर मग तुम्हाला सांगतो.
महागाई भत्ता म्हणजेच डीए किती वाढू शकतो?
प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, जानेवारी ते जून सहामाहीसाठी महागाई भत्त्यात चार ते पाच टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते. भत्त्यात चार टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढेल. कर्मचाऱ्यांचा भत्ता सध्या 46 टक्के आहे. 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत केंद्रातील मोदी सरकारने भत्त्यात चार टक्के वाढ केली होती. त्यानंतर जुलै ते डिसेंबर सहामाहीचा भत्ता ४६ टक्के होता.
भत्ता वाढल्याने एचआरए वाढेल
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 50 टक्के किंवा त्याहून अधिक झाल्यानंतर एचआरएमध्ये सुधारणा केली जाईल. विशेष म्हणजे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भत्ता 50 टक्के किंवा त्याहून अधिक झाल्यास एचआरएमध्ये सुधारणा करण्याचे काम केले जाते.
कधी होऊ शकते घोषणा
आत्तापर्यंतचा पॅटर्न पाहिला तर मार्च महिन्यात सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करते, जी जानेवारी ते जून या कालावधीत लागू होते. त्याचबरोबर जुलै ते डिसेंबर या कालावधीत भत्त्यात वाढ करण्याबाबत बोलायचे झाले तर ऑक्टोबर महिन्यात त्याची घोषणा केली जाते. अशा प्रकारे केंद्रातील मोदी सरकार वर्षातून दोनदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात सहामाही तत्त्वावर वाढ करते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.