
Aavas Finance Share Price | आवास फायनान्सर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मार्च 2024 तिमाहीच्या सकारात्मक अंदाजित निकालामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. मार्च 2024 तिमाहीत आवास फायनान्सर्स कंपनी आपल्या मालमत्ता वितरण आणि व्यवस्थापन व्यवसायात मजबूत वाढ नोंदवण्याची शक्यता आहे. ( आवास फायनान्सर्स कंपनी अंश )
आवास फायनान्सर्स या नॉन-बँकिंग कंपनीने जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत आपल्या कर्ज वितरणात 20 टक्के वाढ नोंदवली आहे. यासह कंपनीचे एकूण कर्ज वितरण 1,890 कोटीवर गेले आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी आवास फायनान्सर्स कंपनीचे शेअर्स 9.80 टक्के वाढीसह 1,594.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
डिसेंबर तिमाहीत या कंपनीचे AUM 22 टक्क्यांच्या वाढीसह 17,300 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील पाच दिवसांत आवास फायनान्सर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर आवास फायनान्सर्स कंपनीच्या शेअर्सने व्हॉल्यूममध्ये मजबूत वाढ नोंदवली होती. शुक्रवारी या कंपनीचे एकूण 34 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. तर या कंपनीच्या शेअर्सची मासिक सरासरी ट्रेडिंग व्हॉल्यूम 9 लाख शेअर्स प्रती दिन होती.
आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये आवास फायनान्सर्स कंपनीने एकूण 21 नवीन शाखा वाढवल्या आहेत. स्मॉलकॅप वर्ल्ड फंड इन्कॉपोरेशन कंपनीने दोन स्वतंत्र खुल्या बाजारातील ट्रेडमध्ये आवास फायनान्सर्स कंपनीचे 1.27 टक्के भागभांडवल कमी केले होते. त्यांनी आवस फायनान्सियर्स कंपनीचे 4.23 लाख शेअर्स सरासरी 1,421.05 रुपये किमतीवर विकले होते. तर 5.82 लाख शेअर्स 1,420.19 रुपये प्रति शेअर किमतीवर विकले होते. Smallcap World Inc चा 2017 च्या अखेरीस आवास फायनान्सर्स कंपनीमध्ये 1.92 टक्के वाटा होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.