
Adani Gas Share Price | अदानी समुहाच्या विरुद्ध हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आपला निकाल जाहीर केला. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने अदानी समुहाला मोठा दिलासा दिला आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी अदानी समुहाचे शेअर्स प्रचंड प्रमाणात वाढले होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या सर्व 10 सूचीबद्ध कंपन्याचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स देखील 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्के वाढीसह 1212 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 1060.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 3128.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर अदानी पोर्टस कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 1125 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 544.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी टोटल गॅस शेअर्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली होती. आता या स्टॉकमध्ये जोरदार सुधारणा पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 1100.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.71 टक्के वाढीसह 1,118.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर NDTV कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 299.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या ACC कंपनीचे शेअर्स 1.50 टक्क्यांच्या वाढीसह 2305.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 541.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.