Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदा घ्या – Marathi News

Adani Green Share Price | गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: AdaniGreen) एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत MOU करार केला आहे. अदानी पॉवर कंपनीने महाराष्ट्रात पुढील 25 वर्षांसाठी अक्षय आणि औष्णिक वीज पुरवठ्याचा करार केला आहे. या बातमीचा सकारात्मक परिणाम सोमवारी अदानी समुहाच्या स्टॉकवर पाहायला मिळाला होता. (अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)

महाराष्ट्रात वीज पुरवठ्याचे काम करणार
अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांपर्यंत वाढले होते. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी अदानी ग्रीन स्टॉक 1.59 टक्के वाढीसह 1,961.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अदानी समुह महाराष्ट्रात 6,600 मेगावॅट क्षमतेच्या दीर्घकालीन अक्षय आणि औष्णिक वीज पुरवठ्याचे काम करणार आहे. या करारासाठी अदानी समूहाने प्रति युनिट 4.08 रुपये बोली लावली आहे.

त्यांच्या बोलीमुळे JSW एनर्जी आणि टोरेंट पॉवर यासारख्या कंपन्यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळवता आला नाही. अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारी 7.53 टक्क्यांच्या वाढीसह 681.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.015 टक्के वाढीसह 666.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी पॉवर कंपनी आणि महाराष्ट्र सरकार
सोमवारी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.39 टक्के वाढीसह 1,920 रुपये किमतीवर पोहचले होते. तर NSE वर हा स्टॉक 7.25 टक्क्यांच्या वाढीसह 1,918 रुपये किमतीवर पोहचला होता. अदानी पॉवर कंपनी पुढील 25 वर्ष महाराष्ट्र राज्याला अक्षय ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा पुरवठा करणार आहे. यामुळे राज्याची भविष्यातील विजेची गरज भागवली जाईल.

Latest Marathi News | Adani Green Share Price 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.