 
						Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 1991.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज मात्र गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केली आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल 2,96,911.05 कोटी रुपये आहे.
या कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी एका अमेरिकन फर्मसह परदेशी बँकांच्या गटाशी भांडवल उभारणीबाबत चर्चा करत आहे. त्यामुळे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सबाबत अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 1.19 टक्के घसरणीसह 1,843.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2,100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या महिन्यात एका अदानी ग्रीन एनर्जी स्टॉकची ट्रेडिंग रेंज 1,700 रुपये ते 2,150 रुपये दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या शेअर्समध्ये 1,746 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट असून आणि 1990 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे.
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 148 टक्के वाढीसह 256 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या डिसेंबर तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 103 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 2,675 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 2,256 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि जगातील आघाडीची अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. कंपनीने नुकताच आपल्या निवेदनात माहिती दिली की, कंपनीने इक्विटी आणि कर्ज भांडवल वाढीसह, 2030 पर्यंत पूर्व निर्धारित 45GW ऊर्जा निर्मिती क्षमता साध्य करण्यासाठी भांडवल व्यवस्थापन योजना आखली आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणावर स्थानिकीकरण, डिजिटलायझेशन, कार्यबल विस्तार आणि क्षमता निर्माण, लवचिक पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करून क्षमता वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने गुजरात राज्यातील खवरा येथे जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या कंपनीची ऑपरेटिंग क्षमता वार्षिक 16 टक्क्यांच्या वाढीसह 8,478 मेगावॅट झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत, वार्षिक आधारावर अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची वीज विक्री 59 टक्क्यांच्या वाढीसह 16,29.3 युनिट नोंदवली गेली आहे. नुकताच अदानी ग्रीन कंपनीने त्याच्या कर्ज रोख्यांची मॅच्युरिटी पूर्ण होण्याआधीच आठ महिन्यापूर्वी 750 दशलक्ष डॉलर निधी जमा केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		