30 June 2022 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

Job Alert | ही दिग्गज आयटी कंपनी तब्बल 1 लाख तरुणांना नोकऱ्या देणार | संधीचा लाभ घ्या

Giant IT company Cognizant

मुंबई, २९ जुलै | नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंट यंदा एक लाख लोकांना नोकऱ्या देणार आहे. जूनच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 51.2 कोटी अमेरिकन डॉलर एवढे (अंदाजे 3,801.7 कोटी) झाले आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. जून 2020 च्या तिमाहीत अमेरिकेतील कंपनीचे एकूण उत्पन्न 36.1 कोटी डॉलर होते.

कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी जॅन सायगमंड म्हणाले, कंपनीच्या आयटी सेवेसह आणि बीपीओ कंपनीत कर्मचारी कार्यरत आहेत. जून तिमाहीअखेर दोन्ही कंपनीमध्ये 3 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसन व बढती अशा विविध गोष्टींकडे लक्ष देत आहोत. कंपनी 2021 मध्ये 30 हजार नवपदवीधर आणि 2022 मध्ये 45 हजार नवपदवीधरांना सेवेत घेणार आहे.

कॉग्निझंटने आर्थिक वर्ष 2021 साठीच्या कमाईच्या वाढीचे लक्ष्य 10.2-11.2 टक्क्यांपर्यंत वाढवले. मागील तिमाहीत कंपनीचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 4.6 अब्ज डॉलर झाला, जो मागील वर्षातील याच कालावधीत 4 अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. कंपनीच्या अंदाजापेक्षा हा आकडा जास्त आहे.

कॉग्निझंट सीईओ ब्रायन हम्फ्रीजच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये आम्ही जवळपास 1 लाख भरती आणि जवळपास 1 लाख सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी करतोय. याशिवाय कॉग्निझंट 2021 मध्ये सुमारे 30,000 नवीन पदवीधर आणि 2022 साठी भारतातील नवीन पदवीधरांना 45,000 ऑफर देण्याची अपेक्षा करतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Giant IT company Cognizant will give one lakh jobs news updates.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x