12 December 2024 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

Panasonic Energy Share Price | रोज 10-20 टक्क्याने अप्पर सर्किट तोडतोय पॅनासॉनिक एनर्जी शेअर, टेस्लासाठी बॅटरीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला

Panasonic Energy Share Price

Panasonic Energy Share Price | पॅनासोनिक एनर्जी इंडिया कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. सोमवारी पॅनासोनिक एनर्जी इंडिया कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 356.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील स्टॉकमध्ये तेजीचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.

पॅनासोनिक एनर्जी इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये इतकी जबरदस्त तेजी येण्याचे कारण म्हणजे, एलोन मस्कची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाच्या बॅटरी पुरवठादारांपैकी एक असलेल्या पॅनासोनिक एनर्जी कंपनीने भारतात उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आणि यासाठी कंपनीने भारत सरकारसोबत संपर्क केला आहे. त्यामुळे आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी पॅनासोनिक एनर्जी इंडिया कंपनी शेअर्स 10.41 टक्के वाढीसह 393.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पॅनासोनिक एनर्जी कंपनीकडून हा निर्णय अशा वेळी जाहीर झाला आहे, जेव्हा टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांनी भारतात कार उत्पादनाची घोषणा केली आहे. पॅनासोनिक एनर्जी कंपनी ACC बॅटरी स्टोरेजसाठी सरकारच्या PLI योजने अंतर्गत भारतात बॅटरी उत्पादन कारखाना स्थापन करण्याची योजना आखत आहे. पॅनासोनिक एनर्जी कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जपानी कंपनीच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक केली होती.

भारताच्या NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि G20 परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत आणि केंद्रीय अवजड उद्योग सचिव कामरान रिझवी आणि पॅनासोनिक एनर्जी कंपनीच्या जपानी टीम सदस्यांनी पॅनासोनिक एनर्जी कंपनीचे ग्लोबल प्रेसिडेंट आणि CEO काझुओ तदानोबू यांच्यासोबत चर्चा केली आहे. Panasonic Life Solutions कंपनीचे अध्यक्ष मनीष शर्मा यांनी देखील या बैठकीत सहभाग घेतला होता.

पॅनासोनिक एनर्जी कंपनी भारतात आपला बॅटरी प्लांट स्थापन करून टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मर्सिडीज बेंझ, ह्युंदाई आणि फोक्सवॅगन ग्रुप यांसारख्या दिग्गज कंपन्यांना कार बॅटरीचा पुरवठा करण्याची योजना आखत आहे. कारण या भारतीय दिग्गज वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक फ्लीटमध्ये तेजीत व्यापार विस्तार करत आहेत. पॅनासोनिक एनर्जी कंपनीच्या बॅटरीचे प्रमुख ग्राहक म्हणून भारतीय वाहन निर्माता कंपन्या उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पॅनासोनिक एनर्जी ही टेस्ला कंपनीला बॅटरी पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Panasonic Energy Share Price today on 18 July 2023.

हॅशटॅग्स

Panasonic Energy Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x