
Adani Group Crisis | अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालानंतर अदानी समूहाच्या अडचणी वाढत आहेत. अब्जाधीश गौतम अदानी आपल्या कॉर्पोरेट आयुष्यातील सर्वात वाईट संकटाशी झुंज देत आहेत. या गटाला एकापाठोपाठ एक मोठा धक्का बसत आहे. दरम्यान, आता अदानींचे अनेक प्रकल्प, ज्यावर अब्जावधी रुपये खर्च केले जात आहेत, ते सर्व संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून त्याबद्दल सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत.
तीन प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी चालविलेल्या तीन अब्जावधी प्रकल्पांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. म्हणजे अदानींच्या या प्रकल्पांवर संकटाचे ढग दाटून येऊ शकतात. हे तिन्ही प्रकल्प मुंबईतील आहेत. यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी), नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील वीज वितरण व्यवसाय यांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे काम सुरू आहे आणि हिंडेनबर्गच्या आरोपांमुळे सुरू असलेल्या गोंधळामुळे ते लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प ३०० हेक्टर जागेवर उभारण्यात येत आहेत. तर नवी मुंबईतील वीज वितरण व्यवसाय २०१८ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडून विकत घेतला होता.
एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर मीडियाच्या प्रतिनिधींना सांगितले की, महाराष्ट्र सरकार या महिन्यात अदानीसोबत सामंजस्य करार करणार होते, परंतु ते आता सुरू राहण्याची शक्यता नाही. दरम्यान, या कंपनीला डीआरपीमधून वगळण्याची आणि नवी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरू असलेल्या बांधकामावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसने केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.