15 December 2024 12:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

RVNL Share Price | मागील 3 महिन्यांत दिला 100% परतावा, आता RVNL शेअर BUY करावा की SELL?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने एप्रिल-जून 2024 तिमाहीमधील आर्थिक कामगिरीचे आकडे जाहीर केले आहेत. जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 34 टक्क्यांनी घसरून 224 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. (आरव्हीएनएल  कंपनी अंश )

शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 3.72 टक्के घसरणीसह 518.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचा महसूल देखील 27 टक्क्यांनी घसरून 4,074 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 5,571.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याचप्रमाणे, आरव्हीएनएल कंपनीचा EBITDA घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा EBITDA जवळपास निम्मा झाला आहे.

जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा EBITDA 48 टक्क्यांनी घसरून 182 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर EBITDA मार्जिन 4.5 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी हेच प्रमाण 6.3 टक्क्यांवर होते. मागील 2 वर्षात आरव्हीएनएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 17 पट अधिक नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

मागील आठवड्यात गुरुवारी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 538.35 रुपये किमतीवर आले होते. मागील एका आठवड्यात आरव्हीएनएल शेअरमध्ये जवळपास 10 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. 2024 या वर्षात आतापर्यंत आरव्हीएनएल स्टॉक तब्बल 195 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 330 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 10 August 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x