27 July 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

Adani Group Shares | अदानी समूहातील या कंपन्यांना सेबीची नजर, स्टॉकवर परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर

Adani Group Shares

Adani Group Shares | ‘हिंडेनबर्ग फर्म’ चा अहवाल आला, आणि अदानी उद्योग समूहातील शेअर्स क्रॅश झाले. त्यानंतर अदानी समूहातील शेअर्स 70 टक्के पेक्षा जास्त कमजोर झाले होते. सेबीने सावधानतेचे पाऊल टाकत अदानी समूहाच्या कंपन्यांवर निगराणी वाढवली. आता सेबीने अदानीच्या दोन कंपन्यांना दीर्घकालीन सर्व्हिलन्स फ्रेमवर्कच्या स्टेज ॥ श्रेणीमध्ये सामील केले आहे. ‘अदानी ट्रान्समिशन’ आणि ‘अदानी टोटल गॅस’ या दोन कंपन्याना दीर्घकालीन सर्व्हिलन्स फ्रेमवर्क स्टेज ॥ श्रेणीमध्ये सामील करण्यात आले आहे.

सेबीने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्यांनी दीर्घकालीन सर्व्हिलन्स फ्रेमवर्क अंतर्गत समाविष्ट करण्याचे निकष पूर्ण केले आहेत. 13 मार्च 2023 पासून याची अमलबजावणी सुरू होईल. 9 मार्च 2023 पासून अदानी उद्योग समूहाच्या तीन कंपन्यांना शॉर्ट टर्म सर्व्हिलन्स फ्रेमवर्क स्टेज-1 मध्ये सामील करण्यात आले होते. ‘अदानी एंटरप्रायझेस’, ‘अदानी पॉवर’, आणि ‘अदानी विल्मार’ या तीन कंपन्याना अतिरिक्त सर्व्हिलन्स फ्रेमवर्कमध्ये सामील करण्यात आले आहे.

स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीने ‘NDTV’ आणि ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीला दीर्घकालीन सर्व्हिलन्स फ्रेमवर्क अंतर्गत ठेवले होते. वास्तविक यूएस स्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते. यानंतर सेबीने गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांना सर्व्हिलन्स अंतर्गत ठेवले होते. शेअर्सच्या किमतींत निर्माण होणारी अस्थिरता टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. असे कठोर निर्णय घेऊन सेबी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढविण्याचा आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते. एएसएममध्ये असलेल्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट व्यवहारावर याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares has recovered after Hindenburg report was published check details on 13 March 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x