
Adani Group Shares | हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालानंतर ही गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या कंपन्यांवर विश्वास कायम ठेवला आहे. हिंडेनबर्ग अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समूहाच्या सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले होते. मात्र काही दिवसांनंतर स्टॉकमध्ये पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील अधिकृत गुंतवणूक अहवालानुसार, किरकोळ गुंतवणूकदारांनी मार्च 2023 तिमाहीत अदानी समूहाच्या कंपनन्यामध्ये 11,292 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार किरकोळ गुंतवणूकदारांनी अदानी ग्रुपच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अंबुजा सिमेंट्स, या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने अदानी ग्रुपच्या कंपन्यावर संशोधन अहवाल जाहीर केला होता. या अहवालात फर्मने अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते, जो अदानी समूहाने फेटाळला होता.
अमेरिकन फर्म ‘GQG पार्टनर्स’ कंपनीने अदानी समूहाच्या 4 कंपन्यांमध्ये तब्बल 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मार्च 2023 मध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आणि यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत सुधारणा पाहायला मिळाली.
अदानी ग्रुपच्या कंपन्यांशिवाय रिटेल गुंतवणूकदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, या कंपन्यामध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार किरकोळ गुंतवणूकदारांनी मार्च 2023 तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये 4334 कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1608 कोटी रुपये, गुंतवणूक केली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये 8823 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.