15 December 2024 6:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Tata Chemicals Share Price | टाटा स्टॉक मध्ये नो घाटा! टाटा केमिकल्स शेअरवर तज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, खरेदी करणार?

Tata Chemicals Share Price

Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या अनेक कंपन्यांनी आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. नुकताच ‘टाटा केमिकल्स’ कंपनीने ही आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात मजबूत वाढ झाली आहे. त्यामुळे तज्ज्ञांना शेअरमध्ये जबरदस्त तेजी संकेत पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या मते, टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 1100 रुपये पर्यंत वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 969.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत ‘टाटा केमिकल्स’ कंपनीने 53.56 टक्के वाढीसह 711 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी म्हणजेच 2021-22 च्या याच तिमाहीत कंपनीने 463 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीचे परिचालन उत्पन्न 26.60 टक्क्यांच्या वाढीसह 4,407 कोटी रुपयेवर पोहचले होते. जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 3,481 कोटी रुपये होते.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये टाटा केमिकल्स कंपनीच्या नफ्यात 86.35 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 2335 कोटी रुपये नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी 2021-22 मध्ये ते कंपनीने 1,253 कोटी रुपये नफा कमाई केली होती. तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीची कमाई 12,622 कोटींवरून वाढून आर्थिक वर्ष 2023 मध्ये ऑपरेशन्समधील उत्पन्न 33.01 टक्क्यांच्या वाढीसह 16,789 कोटी रुपयेवर पोहचले होते.

शेअरची स्थिती :
आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 969.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर तटस्थ राहण्याचा सल्ला दिला आहे. आणि तज्ञांनी स्टॉकवर 1110 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Chemicals Share Price Today on 08 May 2023.

हॅशटॅग्स

Tata Chemicals Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x