
Adani Group Shares Price | हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानीयांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवार, 2 फेब्रुवारी 2023 रोजी गौतम अदानीयांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली असून अनेक शेअर्समध्ये लोअर सर्किटही पाहायला मिळत आहे. अदानी समूहात एवढी भयंकर घसरण पाहायला मिळेल, अशी अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल.
अदानी ग्रुप
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत असतानाच अदानी समूहाच्या शेअर्समध्येही गदारोळ माजला आहे. त्याचबरोबर अदानी समूहाने आपल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ काढून घेत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
लोअर सर्किट
आज शेअर बाजार उघडताच अदानी समूहातील जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये घसरण दिसून आली आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स अँड सेझ, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन मध्ये १० टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, अदानी पॉवर आणि अदानी विल्मरचा शेअर 5 टक्के लोअर सर्किट आहे.
ग्रुपच्या शेअर्सची स्थिती अशी आहे :
अदानी एंटरप्राइजेज- (बीएसई प्राइस डाउन: 1,915.85 -10.00%) (एनएसई प्राइस डाउन: 1,921.85 -10.00%)
अदानी ग्रीन एनर्जी- (बीएसई प्राइस डाउन: 1,038.05 -10.00%) (एनएसई प्राइस डाउन: 1,039.85 -10.00%)
अदानी पोर्ट्स एंड सेज़- (बीएसई प्राइस डाउन: 442.95 -10.00%) (एनएसई प्राइस डाउन: 445.65 -10.00%)
अदानी पावर- (बीएसई प्राइस डाउन: 202.15 -4.98%) (एनएसई प्राइस डाउन: 202.05 -4.98%)
अदानी टोटल गैस- (बीएसई प्राइस डाउन: 1,711.50 -10.00%) (एनएसई प्राइस डाउन: 1,707.70 -10.00%)
अदानी ट्रांसमिशन- (बीएसई प्राइस डाउन: 1,557.25 -10.00%) (एनएसई प्राइस डाउन: 1,551.15 -10.00%)
अदानी विल्मर- (बीएसई प्राइस डाउन: 421.45 -4.99%) (एनएसई प्राइस डाउन: 421.00 -5.00%)
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.