3 May 2025 6:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Adani Group Shares | अदानी शेअर्समध्ये आता गुंतवणूक करावी का? तज्ज्ञांनी अदानी गृपच्या 3 शेअर्सचे विश्लेषण करून दिलेली रेटिंग पहा

Highlights:

  • Adani Group Shares
  • अदानी टोटल गॅस शेअर
  • अदानी ग्रीन शेअर
  • अदानी ट्रान्समिशन शेअर
Adani Group Shares

Adani Group Shares | हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स क्रॅश झाले होते. आणि गुंतवणुकदारांना फार मोठा नुकसान सहन करावा लागला होता. मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन कंपनीच्या शेअर धारकांना जबर फटका बसला आहे. सध्या नवीन गुंतवणूकदारांसाठी हे तीन शेअर्स 50 ते 81 टक्के स्वस्त किमतीवर उपलब्ध आहेत.

मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरची किंमत 3550.75 रुपयेवरून घसरून 672.25 रुपयेवर आली आहे. तर अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरची किंमत 2657 रुपयेवरून घसरून 831.30 रुपयेवर आली आहे. अदानी ग्रीन कंपनीच्या शेअरमध्ये तर 41 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. हा स्टॉक 2024.90 रुपयेवरून 983.80 रुपयांपर्यंत घसरला होता.

साहजिकच शेअर मध्ये घसरण झाल्यावर स्वस्त किंमत पाहून गुंतवणुकदार अशा शेअरकडे अधिक आकर्षित होतात. अदानी गॅस स्टॉक खरेदी करण्यापूर्वी त्यातील सकारात्मक आणि नकारात्मक गुण जाणून घेणे खूप गरजेचे आहे. अदानी टोटल गॅस स्टॉक आपल्या स्पर्धक कंपनीच्या तुलनेत आर्थिक, मालकी, मूल्यांकन, तेजी आणि कामगिरी बाबत कोणत्या लेव्हलवर आहेत, हे जाऊन घेऊ.

अदानी टोटल गॅस शेअर

या स्टॉकला तज्ञांनी एकूण 12 नकारात्मक आणि 11 सकारात्मक गुण दिले आहेत. आर्थिक आघाडीवर तज्ञांनी या स्टॉकला 6 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गुण दिले आहेत. मालकीच्या दृष्टीने 3 सकारात्मक आणि 1 नकारात्मक गुण दिला आहे. तर स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत तज्ञांनी या स्टॉकवर 2 नकारात्मक आणि 1 सकारात्मक गुण दिला आहे. मूल्य आणि तेजीला 7 नकारात्मक आणि एक सकारात्मक गुण दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 671.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन शेअर

अदानी ग्रीन स्टॉकला तज्ञांनी एकूण 12 नकारात्मक आणि 11 सकारात्मक गुण दिले आहे. आर्थिक आघाडीवर 3 सकारात्मक आणि 5 नकारात्मक गुण दिले आहेत. तर मालकीच्या दृष्टीने 2 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गुण दिले आहेत. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत तज्ञांनी या स्टॉकवर 1 नकारात्मक आणि 2 सकारात्मक गुण दिले आहेत. मूल्य आणि तेजीला 4 नकारात्मक आणि 4 सकारात्मक गुण दिले आहेत. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 969.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ट्रान्समिशन शेअर

अदानी ट्रान्समिशन कंपनीला तज्ञांनी एकूण 26.09 टक्के गुण दिले आहेत. यात एकूण 17 नकारात्मक आणि 6 सकारात्मक गुण दिले आहेत. आर्थिक आघाडीवर तज्ञांनी या स्टॉकला 2 सकारात्मक आणि 6 नकारात्मक गुण दिले आहेत. तर मालकीच्या दृष्टीने 2 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गुण दिले आहेत.

स्पर्धक कंपनीच्या तुलनेत 2 नकारात्मक आणि 1 सकारात्मक गुण दिला आहे. मूल्य आणि तेजीला 7 नकारात्मक आणि 1 सकारात्मक गुण दिले आहेत. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 822.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares today on 17 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या