
Adani Group Stocks | हिंडनबर्ग अहवाल समोर आल्यानंतर अदानी उद्योग समूहाच्या अनेक कंपन्यांना जबर दणका बसला आहे. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाच्या कंपन्याबाबत हिंडनबर्ग फर्मने अहवाल प्रसिद्ध केला आणि अदानी समूहाच्या शेअरमध्ये 70 टक्के पर्यंत घसरण पाहायला मिळाली आहे. अदानी समृहाचे सर्व शेअर्स गेल्या काही आठवड्यापासून जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. आजही अदानी समूहाचे सर्व निशाणीवर ट्रेड करत आहेत.
अदानी टोटल गॅस :
या कंपनीचे शेअर्स आतपर्यंत 70 टक्के खाली आले आहेत. अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स हिंडनबर्ग अहवाल आल्यानंतर सर्वात जास्त पडले आहेत. 24 जानेवारी 2023 पासून हा स्टॉक 70 टक्के खाली आला आहे. 24 जानेवारी 2020 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 2005.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणी 1,133.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4000 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1133.05 रुपये होती.
अदानी ग्रीन एनर्जी :
या कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 64 टक्के कमजोर झाले आहेत. हिंडनबर्ग अहवाल आल्या या स्टॉकमध्ये 64 टक्के पेक्षा जास्त पडझड पाहायला मिळाली होती. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 653.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3050 रुपये होती. 52 आठवडयांची नीचांक किंमत पातळी 653.65 रुपये आहे.
अदानी पॉवर :
या कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 45.70 टक्के खाली आले आहेत. मागील काही दिवसांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 274.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 148.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 45.70 टक्के पडले आहेत.
अदानी एंटरप्रायझेस :
या कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 50.50 टक्के पडले आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 3442.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर 5.25 टक्के वाढीसह 1,807.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 24 जानेवारीपासून अदानी पोर्टस कंपनीचे शेअर्स देखील 268 रुपये खाली आले आहेत. 21 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 750.85 रुपयांवर ट्रेड करत होते. कंपनीचे शेअर्स 14 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स 2.36 टक्के वाढीसह 566.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.