
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीने आपल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. MAT क्रेडिट राइट ऑफमुळे अदानी पोर्ट कंपनीला तोटा झाला असला तरी, कंपनीच्या महसूलात 28 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 1150 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत शेअरच्या सध्याच्या किमतीपेक्षा 30 टक्के अधिक आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन स्टॉक 0.47 टक्के वाढीसह 809.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 916 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 395.10 रुपये होती. हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल जाहीर होण्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स ज्या किमतीवर होते, त्या किमतीपेक्षा हा शेअर्स 7 रुपये खाली आहे.
याउलट अदानी समुहाचे इतर काही शेअर्स 84 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. मागील सहा महिन्यांत हा कंपनीच्या शेअरची किंमत 18 टक्के वाढली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरवर 958 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती.
मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज फर्मने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन स्टॉकवर 1,050 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने नुकत्याच अधिग्रहित केलेल्या बंदरांवर ऑपरेशन्स रॅम्प-अपमुळे आर्थिक वर्ष 2023-25 मध्ये कंपनीच्या कार्गो व्हॉल्यूममध्ये 13 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.
यामुळे कंपनीच्या महसूल संकलनात वाश होईल, आणि कंपनीचा एबिटा देखील वाढेल. जेफरीज फर्मने अदानी पोर्ट्स स्टॉकवर 985 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर CLSA ने या स्टॉकवर 878 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
अदानी पोर्ट्स कंपनीने मे 2023 या महिन्यात 24,000-25,000 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि कंपनीचा EBITDA 14,500-15,000 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील एका वर्षभरात कंपनीचा एकूण भांडवली खर्च 4,000-4,500 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. अदानी पोर्ट्स कंपनीने एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये 240 MMT मालाची आयात निर्यात केली होती. त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनी 370-390 MMT आयात निर्यात करेल अशी अपेक्षा आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.