
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक कंपनीचे शेअर्स 1354.40 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र नंतर शेअरमध्ये मजबूत नफा वसुली झाली. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1700 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक कंपनी अंश )
मार्च तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसनी अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1425 रुपये होती. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 1.56 टक्के घसरणीसह 1,317.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
Citi फर्मने अदानी पोर्ट्स स्टॉकवर 1782 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स 33 टक्के अधिक वाढू शकतात. Citi ने यापूर्वी अदानी पोर्ट्स स्टॉकवर 1758 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती.
ब्रोकरेज हाऊस जेफरीजने अदानी पोर्ट्स स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीजच्या मते, या कंपनीचे शेअर्स 1640 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. एचएसबीसीने अदानी पोर्ट्स स्टॉकवर 1560 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
मागील एका वर्षात अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात अदानी पोर्ट्स स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 3 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1354.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 6 महिन्यांत अदानी पोर्ट्स स्टॉक तब्बल 69 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 795.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1350 रुपये किमतीवर पोहचला आहे. अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 659.85 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.