
Adani Port Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 1441.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात अदानी पोर्ट कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )
शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1600 रुपये किमतीवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी अदानी पोर्ट स्टॉक 1.80 टक्के वाढीसह 1,429.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1650 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीवरून 18 टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेज हाऊसने याआधी अदानी पोर्ट स्टॉकवर 1550 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. मागील एका वर्षात अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 739.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 14 जून 2024 रोजी हा स्टॉक 1441.95 रुपये किमतीवर पोहचला होता.
मागील 16 महिन्यात अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 189 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1607.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 702.85 रुपये होती. एप्रिल-मे 2024 मध्ये अदानी पोर्ट्स स्टॉकची व्हॉल्यूम 14 टक्के वाढली आहे. मागील एका दशकभरात अदानी पोर्ट्स कंपनीने अनेक खाजगी कंपन्यांकडून प्रमुख बंदरे खरेदी केली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीने भारतातील धामरा, कट्टुपल्ली, कृष्णपट्टणम, गंगावरम आणि सुरगुजा रेल्वेमध्ये देखील गुंतवणूक केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.