
Adani Port Share Price | इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे. इराणने नुकताच इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. आणि भारतीय शेअर बाजारात मंदीचे सावट पसरले. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनी अंश )
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात आले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 1.33 टक्के घसरणीसह 1,298 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अदानी पोर्ट्स आणि इस्रायलस्थित गॅडोट ग्रुप इस्रायलमधील हैफा बंदर संयुक्तपणे हाताळत आहे. त्यांनी हैफा बंदराचे संपादन 1.18 बिलियन डॉलर्सला केले होते. यामध्ये अदानी समूहाचा वाटा 70 टक्के आणि गॅडॉट ग्रुपचा वाटा 30 टक्के आहे. पर्यटक क्रूझ जहाजांच्या दृष्टीने हैफा हे इस्राईलमधील सर्वात मोठे बंदर आहे. शिपिंग कंटेनर्स हतळणीच्या बाबतीत देखील हैफा हे इस्रायलमधील दुसरे सर्वात मोठे जहाज बंदर आहे.
2 एप्रिल 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 1,425 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 650 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. इस्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत भारताने चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.
भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांतील दूतावास तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाबाबत भारत अत्यंत चिंतित आहे. यामुळे मध्य आशिया विभागातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकारने दोन्ही देशांना तात्काळ तणाव कमी करण्याचे आणि संयम बाळगण्याचे तसेच कोणत्याही हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.