 
						Adani Port Share Price | अदानी समुहाच्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. यांचे मुख्य कारण म्हणजे, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC या भारतातील सर्वात मोठ्या विमा आणि गुंतवणूक कंपनीने अदानी समूहाचा भाग असलेल्या तीन कंपन्यांचे शेअर्स विकले आहेत.
डिसेंबर 2023 तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानुसार LIC कंपनीने अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्टस कंपनीचे शेअर्स विकले आहेत. एकूणच LIC कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत तीन अदानी कंपन्यांमधील 3,72,78466 शेअर्स विकल्याची माहिती मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी अदानी पोर्ट स्टॉक 1.97 टक्के घसरणीसह 1,169.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
LIC ही सरकारी विमा कंपनी अदानी समुहातील सर्वात मोठ्या संस्थागत गुंतवणूकदारांपैकी एक आहे. एलआयसी कंपनीने अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीमधील आपला वाटा सप्टेंबर 2023 तिमाहीतील 3.68 टक्केवरून डिसेंबर 2023 तिमाहीत 3 टक्केवर आणला आहे.
या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के घसरणीसह 1127 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,25,827.57 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी अदानी एनर्जी सोल्युशन्स स्टॉक 3.40 टक्के घसरणीसह 1,088 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एलआयसी कंपनीने अदानी एंटरप्रायझेस कंपनीमधील आपला वाटा तिमाही दर तिमाही 4.23 टक्के वरून कमी करून 3.93 टक्केवर आणला आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3068.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,49,826.44 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 2.57 टक्के घसरणीसह 2,978 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एलआयसी कंपनीने अदानी पोर्टस कंपनीमधील आपला वाटा सप्टेंबर 2023 तिमाहीतील 9.07 टक्केवरून कमी करून तिसऱ्या तिमाहीत 7.86 टक्केवर आणला आहे. LIC कंपनीने अदानी समुहामध्ये सर्वात मोठी गुंतवणूक केली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित घसरणीसह 1196.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,58,363,42 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		