 
						Adani Port Share Price | मागील काही दिवसांपासून अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. अदानी समुहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने एक महतत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.
सध्या अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. जर शेअर बाजारात अशीच तेजी टिकुन राहिली तर अदानी पोर्ट स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट स्टॉक 0.078 टक्के घसरणीसह 1,027.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्म UBS ने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीच्या शेअरवर संशिधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. UBS या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँकेने अदानी पोर्ट्स कंपनीच्या स्टॉकवर ‘न्यूट्रल’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने अदानी पोर्ट स्टॉकची टारगेट प्राइस 1,175 रुपये निश्चित करण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये 6 टक्के घसरण पहायला मिळाली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 23 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
मागील सहा महिन्यांत अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 166 टक्के परतावा कमावून दिला आहे.
नुकताच अदानी पोट्स कंपनीने 5,250 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर आणि नॉन-क्युम्युलेटिव्ह रिडीमेबल शेअर्स जारी करून 5,250 कोटी रुपये निधी जमा करण्याची घोषणा केली आहे. कंपनी हा निधी आपल्या भांडवली खर्च, विद्यमान कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूवर खर्च करणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने 5,000 कोटी रुपये निधी उभारण्यासाठी नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करण्याची मंजुरी दिली आहे. तर अदानी पोर्ट कंपनी नॉन क्युम्युलेटिव्ह रिडीम करण्यायोग्य प्रेफरंस शेअर्स जारी करून 250.19 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		