1 May 2024 4:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स पुन्हा पॉवर दाखवणार, कंपनीच्या 'या' निर्णयाने शेअर्स गुंतवणूकदारांना फायदा होणार?

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये अदानी पॉवर स्टॉक दीड टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.

अर्डोर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग आणि इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट DMCC ने 26 सप्टेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करून आपली आपले स्टेक वाढवले आहे. म्हणून अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.86 टक्के वाढीसह 393.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पॉवर कंपनीच्या दोन्ही मुख्य प्रवर्तकांनी खुल्या बाजारातून स्टॉक खरेदी करून आपले स्टेक वाढवले आहेत. Ardor Investment कंपनीने 7.42 कोटी शेअर्स खरेदी करून आपले भाग भांडवल 1.93 टक्क्यांवर नेले आहे. इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट DMCC कंपनीने अदानी पॉवर कंपनीचे 50 लाख शेअर्स खरेदी करून आपले भाग भांडवल 0.13 टक्क्यांनी वाढवले आहे.

या गुंतवणूकदारांनी खुल्या बाजारातील हा व्यवहार 26 सप्टेंबर ते 16 नोव्हेंबर 2023 दरम्यान केला आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार अदानी पॉवर कंपनीमध्ये आर्डोर इन्व्हेस्टमेंट कंपनीने 0.80 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट DMCC कंपनीने 5.61 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

अदानी पॉवर कंपनीच्या या दोन्ही मुख्य प्रवर्तकाने अदानी पॉवरमध्ये दुसऱ्यांदा आपले भाग भांडवल प्रमाण वाढवले आहे. यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये फोर्टीट्यूड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट आणि इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट डीएमसीसीने अदानी पॉवर कंपनीचे भाग भांडवल खरेदी केले होते. 5 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2023 दरम्यान फोर्टीट्यूड ट्रेड अॅड इन्व्हेस्टमेंट कंपनीने अदानी पॉवर कंपनीने खुल्या बाजारातून 6.59 कोटी शेअर्स खरेदी केले होते.

सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत अदानी पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांनी 70.02 टक्के भाग भांडवल धारण केले होते. सप्टेंबर 2023 तिमाही डेटानुसार एसबी अदानी फॅमिली ट्रस्ट कंपनीने अदानी पॉवर कंपनीचे 36.86 टक्के आणि फ्लोरीश ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीने अदानी पॉवर कंपनीचे 11.46 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE 21 November 2023.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x