9 June 2023 6:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Money Making Stock | ओ भाऊ! या 5 शेअर्सना हलक्यात घेऊ नका, सय्यम करोडोपती करेल तुम्हाला, शेअर्सची नावं नोट करा

Money Making stock

Money Making Stock | लार्ज कॅप सेगमेंटमध्ये भारतातील प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपच्या पाच कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध आहेत. अदानी पॉवर , अदानी एंटरप्रायझेस , अदानी टोटल गॅस , अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशन या मल्टीबॅगर परतावा निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत गेल्या एका वर्षात या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये 66.15 टक्के 230 टक्के वाढ झाली आहे.

Adani Green लिमिटेड:
या कंपनीच्या शेअरने लोकांना अल्पावधीत लखपती केले आहे. अदानी ग्रीनने मागील एका वर्षात 1314.35 रुपयांवरून 2183.80 रुपयांपर्यंत उसळी घेतली आहे. एका वर्षात या स्टॉकने लोकांना 66.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षांत या स्टॉकने लोकांना 2182 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3050 रुपये आहे, तर नीचांक किंमत पातळी 1235 रुपये होती.

अदानी पॉवर :
या वर्षी सर्वाधिक परतावा देणाऱ्या टॉप -10 लार्ज कॅप शेअर्स ची माहिती काढली तर त्या यादीत अदानी समूहाच्या चार कंपन्यां आहेत. एका वर्षात सर्वाधिक परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये अदानी पॉवर कंपनी अव्वल स्थानावर आहे. हा स्टॉक फक्त एका वर्षापूर्वी 106.75 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आगा 230 टक्क्यांच्या वाढीसह 352 रुपयांवर ट्रेड करत आहे. मागील 3 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 479 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 432.50 रुपये आहे, तर नीचांक पातळी किंमत फक्त 23 रुपये होती.

अदानी एंटरप्रायझेस :
या कंपनीच्या शेअर्स लोकांना 138 टक्के परतावा कमावून दिला आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनी परतावा देण्याबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अदानी समूहाच्या या शेअर्सनी फक्त एका वर्षात लोकांना 138 टक्के नफा मिळवून दिला आहे. या स्टॉकने फक्त एका वर्षात 1711.60 रुपयांवरून 4073.85 रुपयांवर उसळी घेतली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीने मागील तीन वर्षांत 1911 टक्के परतावा दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4096 रुपये आहे, नीचांक किंमत पातळी 1528.80 रुपये होती.

अदानी टोटल गॅस :
अदानी गॅस ही कंपनी परतावा देण्याबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीचे समभागाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 132 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. एक वर्षभरापूर्वी अदानी टोटल गॅस कंपनीच्या एका शेअरची किंमत 1648.75 रुपये होती. आज हा स्टॉक 132 टक्क्यांनी वाढला असून त्याची किंमत 3838.45 रुपयेवर पोहोचली आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2527 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3912.40 रुपये आहे. आणि स्टॉकची नीचांक किंमत पातळी 1510.30 रुपये होती.

अदानी ट्रान्समिशन:
या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. सफालर इंडिया , वरुण बेव्हरेजेस , एचएएल आणि सीजी पॉवरनंतर अदानी ट्रान्समिशन ही कंपनी बंपर परतावा देणाऱ्या स्टॉकच्या टॉप-10 लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. अदानी समूहातील या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात हा स्टॉक 1119 टक्के पेक्षा अधिक वाढला आहे.या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1650.25 रुपये होती, आणि उच्चांक किंमत पातळी 4236.75 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List Of Adani group Stock which has given Multibagger returns on investment on 18 November 2022.

हॅशटॅग्स

Money Making Stock(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x